Take a fresh look at your lifestyle.

आता बोला..! मोदी सरकारच म्हणतेय, होय.. खाद्यतेलाचे भाव वाढलेत..! संसदेत राज्यमंत्र्यांनी काय माहिती दिली, तुम्हीच पाहा..

नवी दिल्ली : वाढत्या महागाईने सर्वसामन्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आलीय. पेट्रोल, डिझेल गॅससह खाद्यतेलाच्या दराचे राेज नवनवे विक्रम होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झालीय. अखेर राज्यसभेतही हा मुद्दा चर्चेला आला असता, खाद्यतेलाच्या किमती करण्यासाठी केलेले सगळे उपाय निष्फळ ठरल्याची अप्रत्यक्ष कबुलीच मोदी सरकारने दिली.

Advertisement

राज्यसभेमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री अश्विनी कुमार यांनी खाद्यतेलाच्या महागाईची आकडेवारी सरकारकडून सादर केली. त्यात जुलैमध्ये खाद्यतेलाच्या किमतीत सरासरी ५२ टक्के वाढ झाल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement

राज्यमंत्री अश्विनी कुमार म्हणाले, की जुलैमध्ये शेंगदाणा तेलाच्या किमतीत सरासरी १९.२४ टक्के वाढ झाली. राईच्या तेलाचा भाव तब्बल ३९.०३ टक्क्यांनी वधारला. वनस्पतीचा भाव ४६.१९ टक्के, सोयाबीन तेल ४८.०७ टक्के, तर सनफ्लॉवर तेलाचा भाव ५१.६२ टक्के वाढला. पाम तेलाचा भावही ४४.४२ टक्क्यांनी वाढल्याची कबुली अश्विनी कुमार यांनी दिली.

Advertisement

अश्विनी कुमार पुढे म्हणाले, की खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. अत्यावश्यक खाद्यवस्तूच्या (डाळी, खाद्यतेल) दरवाढीला वेसण घालण्यासाठी उपाय करीत आहोत.

Advertisement

भारत खाद्यतेलाच्या एकूण मागणीच्या ६० ते ७० टक्के तेलाची आयात करतो. तेलाच्या किमती स्थिर राहण्यासाठी सीमा शुल्क विभाग करांबाबत सतर्क आहेत. केंद्र सरकरने ३० जून ते ३० सप्टेंबर कालावधीसाठी कच्च्या पामतेलावरील आयात शुल्क ५ टक्क्यांनी कमी केले आहे. त्यामुळे पाम तेलावरील आयात शुल्क ३०.२५ टक्के झाले आहे. तसेच आरबीडी पामोलिन तेलाबाबतच्या आयात धोरणातही बदल केल्याचे अश्विनी कुमार यांनी सांगितले.

Advertisement

मोदी सरकार पुन्हा वाढविणार गॅसची किंमत..! काॅमन मॅनचे बजेट कोलमडले, एका सिलींडरसाठी आता किती पैसे मोजावे लागणार..?
ऑगस्टमध्ये कमी काम, करा नुसता आराम..! बॅंकांना या महिन्यात सुट्याच सुट्या, पाहा ही यादी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply