Take a fresh look at your lifestyle.

वर्षात लाखाचे 15 लाख..! गुंतवणुकदारांना ‘या’ शेअरने केलेय मालामाल.. जाणून घेण्यासाठी वाचा..!

मुंबई : यंदाच्या वर्षात शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले. त्यातही सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. त्यापैकीच एक आहे, ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड’..!

Advertisement

सध्या या कंपनीच्या (MLL) समभागाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे, कारण गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. कसे ते तुम्हीच पाहा..

Advertisement

महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 27 जुलै 2020 रोजी 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत पोचलीय 807.30  रुपयांवर.. म्हणजेच समजा एखाद्या गुंतवणुकदाराने वर्षभरापूर्वी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील, तर आता त्याची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेलीय.

Advertisement

भांडवली बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्सची मार्केट कॅप 5370 कोटींपर्यंत विस्तारली आहे. 13 जुलैपासून हा समभाग सातत्याने वरच्या दिशेने प्रवास करीत असून, त्याची किंमत आणखी वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टेक्निकल एनालिसिसमध्येही ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’ सर्व निकष पाळत असून,  आगामी काळात हा शेअर आणखी दमदार वाटचाल करील, असे संकेत आहेत.

Advertisement

दरम्यान, गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिलाय. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपयांवर गेला आहे.

Advertisement

एका सत्रात गुडलक इंडियाच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, 10 टक्क्यांवर अप्पर सर्किट लागले. गेल्या पाच सत्रांमध्ये या समभागाची किंमत तब्बल 31 टक्क्यांनी वाढली आहे.

Advertisement

आता बोला..! मोदी सरकारच म्हणतेय, होय.. खाद्यतेलाचे भाव वाढलेत..! संसदेत राज्यमंत्र्यांनी काय माहिती दिली, तुम्हीच पाहा..
मोदी सरकार पुन्हा वाढविणार गॅसची किंमत..! काॅमन मॅनचे बजेट कोलमडले, एका सिलींडरसाठी आता किती पैसे मोजावे लागणार..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply