Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार पुन्हा वाढविणार गॅसची किंमत..! काॅमन मॅनचे बजेट कोलमडले, एका सिलींडरसाठी आता किती पैसे मोजावे लागणार..?

मुंबई : पेट्रोल-डिझेल व गॅसमधील दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलेय. सतत होणारी इंधन दरवाढ आणि त्यातून वाढणारी महागाई, यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात मोदी सरकार या ‘काॅमन मॅन’ला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली जाणार असल्याचे संकेत आहेत.

Advertisement

पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याला इंधन आणि एलपीजी गॅसच्या दरांचा आढावा घेत असतात. प्रत्येक राज्यात पेट्रोलियम पदार्थांवरील कर वेगवेगळा आकारला जातो. त्यामुळे दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता शहरांमध्ये एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरचा दर वेगवेगळा आहे.

Advertisement

सध्या देशभरात 14.2 किलोच्या LPG सिलिंडरसाठी साधारण 834 ते 861 रुपये मोजावे लागतात. सध्या पेट्रोल-डिझेलच्या दराची वाटचाल पाहता, केंद्र सरकार लवकरच गॅसच्या दरातही वाढ करणार असल्याची चर्चा आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात निर्णय होऊ शकतो.

Advertisement

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या महिन्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे 1 जून रोजी मुंबईत घरगुती सिलेंडरची किंमत 809 रुपयांवरून 834 रुपयांवर गेली होती, चेन्नई व कोलकातामध्ये सिलिंडरचा दर अनुक्रमे 825 व 835.50 रुपये झाला होता. तो आता अनुक्रमे 850.50 आणि 861 रुपये होणार आहे.

Advertisement

येथे पाहा गॅस सिलिंडरची किंमत
सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर एलपीजी सिलिंडरची किंमत पाहता येते. येथे कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या संकेतस्थळावर आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

Advertisement

ऑगस्टमध्ये कमी काम, करा नुसता आराम..! बॅंकांना या महिन्यात सुट्याच सुट्या, पाहा ही यादी..!
आयकर पोर्टल ऑगस्टपासून सेवेत..! मोदी सरकारची ग्वाही, करदात्यांना कसा फायदा होणार, जाणून घेण्यासाठी वाचा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply