Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मोदींचा दावा जगभरात व्हायरल; कुणाल कामराचा व्हिडीओ थेट न्यूयॉर्क टाईम्सवर..!

मुंबई : काहीही झाले तरी श्रेय घेणे आणि आपणच ते केल्याची टिमकी वाजवण्याची बहुसंख्य भारतीयांना सवय असते. तसाच प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सत्ताधीश भाजप करीत असल्याचे आरोप नियमितपणे होत असतात. आताही करोनाच्या निमित्ताने असाच प्रयत्न मोदींनी केल्याकडे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने लक्ष वेधले आहे आणि जगात तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Advertisement

‘शटअप यार कुनाल’ असे वाक्य जगभरात चर्चेत असते. कुणाल कामरा नावाचा तरुण आपल्या वेगळ्या स्टाईलने सरकारी यंत्रणा आणि सिस्टीम नावाच्या बोगसगिरीची चिरफाड त्याद्वारे करीत असतो. त्याच कुणालच्या एका व्हिडिओची दखल जगप्रसिद्ध माध्यम समूह असलेल्या न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकन दैनिकाने घेतली आहे.

Advertisement

Advertisement

याबाबत माहिती देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया प्रदेश सचिव वेदिका कळंत्रे-जैन यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सच्या ऑफिशियल युट्युब चॅनेलवरून कुणाल कामराचा व्हिडिओ प्रसारित झालाय. जगभरात मोदींची नाचक्की चालू आहे आणि मोदी इकडे वॅक्सिन फ्री दिले म्हणून हे बोर्ड लावत आहेत. मोदींनी मागे नोटबंदीमध्ये जनतेची अक्षरशः वाट लावली. नंतर अर्थव्यवस्थेची लावली आणि नंतर आता कोरोनामध्ये पुन्हा परिस्थिती हाताळता नाही आली. वरती जाहिरातीवर हजारो कोटी उधळत आहेत. त्यात आता मोबाईल हॅकिंगचे शस्त्र वापरून सर्वांवर नजर ठेवत आहेत.

Advertisement

हा व्हिडीओ भले एक महिना जुना आहे. मात्र, जगभरातील माध्यमे भारतातील करोना संकट, आरोग्य व्यवस्था, सरकारी यंत्रणांचा कारभार आणि मोदींसह अनेक वृत्तवाहिन्या ज्याला सिस्टीम म्हणून जबाबदारी ढकलून केंद्र सरकारला क्लीन करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनाच ही चपराक आहे. एकूणच या मोठ्या माध्यम समूहाने भारतातील करोना संकटाशी दोन हात करताना केंद्र आणि राज्य सरकारे कशी जबाबदार आहेत याकडेच लक्ष वेढलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply