Take a fresh look at your lifestyle.

ममतादीदीचा असाही ‘खेला होबे’..! पहा आज नेमके काय करण्याची शक्यता आहे ते..

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना क्रांतिकारी वाटणारे कृषी सुधारणा विधेयक अनेक शेतकऱ्यांना मान्य नाही. अनेक राज्य सरकारांनी त्याला डावलून आपले वेगळे कृषी कायदे बनवले आहेत किंवा त्यावर कार्यवाही सुरू केली आहे. अशावेळी दिल्लीच्या परिसरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने अजिबात दखल घेतलेली नाही.

Advertisement

त्यामुळेच आता देशाच्या राजकारणात लक्ष केंद्रित करून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या भाजपला हादरा देण्याची तयारी केलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज या आंदोलकांच्या भेटीला जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. न्यूज २४ या वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, ‘ममता बनर्जी आज सुबह गाज़ीपुर बॉर्डर पर किसानों से मिल सकती है.’

Advertisement

एकूणच सध्या लोकसभा अधिवेशन आणि ममता दीदी यांच्या भेटीगाठी यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण तप्त आहे. अशावेळी विरोधकांच्या नेत्या बनण्याची तयारी असलेल्या ममता दीदी शेतकरी आंदोलकांना भेटून आपला पाठींबा देण्याची शक्यता आहे. या बातमीने राजाधीनीतील वातावरण आणखी तापलेले आहे. त्या भेट घेणार किंवा नाही यावरच सध्या चर्चा चालू आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply