Take a fresh look at your lifestyle.

सोने वधारले, चांदीची चमकही वाढली, सराफ बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..!

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात आज बर्‍याच दिवसांच्या घसरणीनंतर चांगली वाढ झाली. त्यामुळे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या जवळ पोहोचले. चांदीच्या दरातही आज 1200 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. यासह चांदी 66 हजार रुपये प्रतिकिलोवर गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने-चांदीच्या किमती वाढल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,610 रुपये प्रति तोळा होते, तर चांदीचे दर 64,994 रुपये प्रति किलो होते.

Advertisement

दिल्लीतील सराफा बाजारात आज (गुरुवारी) सोन्याच्या दरात 382 रुपयांची वाढ झाली. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,992 रुपये प्रति तोळा झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात किरकोळ वाढ होऊन सोन्याचे दर 1,817 डॉलर प्रति औंस झाले होते.

Advertisement

दरम्यान, चांदीच्या दरातही आज मोठी वाढ झाली. दिल्लीतील सराफा बाजारात चांदीमध्ये 1,280 रुपयांची तेजी दिसून आली. त्यामुळे चांदीचे दर 66,274  रुपये प्रति किलो झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव वाढल्याने चांदी 25.42 डॉलर प्रति औंस झाली.

Advertisement

यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्‍सचेंजमध्ये किंमती वाढल्यामुळे सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले.

Advertisement

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी यांच्या मते, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या दरात वाढ झाल्यामुळे डॉलरवर दबाव आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढली, परिणामी सोन्याचे दर वाढले.

Advertisement

झोमॅटोच्या तेजीला ब्रेक..! शेअर बाजार गडगडला, कोट्यवधीचा फटका..!
मोदींच्या महापूर मदतीनिमित्ताने NCP ने वेधले ‘त्याकडे’ लक्ष; पहा नेमके काय म्हटलेत त्यांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply