Take a fresh look at your lifestyle.

कर्जबुडव्यांवर बडगा..! जामीनदारावरही होणार कठाेर कारवाई, पाहा मोदी सरकारने काय निर्णय घेतलाय..?

नवी दिल्ली : मागील काही दिवसांत अनेक कर्जदारांनी बॅंकांना चुना लावल्याचे समाेर आलेय. त्यामुळे बॅंका अडचणीत आल्या. मात्र, आगामी काळात केंद्र सरकार अशा कर्जबुडव्यांकडून वसुलीसाठी कठोर पावले उचलणार आहे. कर्जदारांसाठी हमीदार राहिलेल्या लोकांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास हेतुपुरस्कर कर्जबुडव्यांविरूद्ध फौजदारी कारवाईदेखील बँका करू शकतात, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेला पत्राद्वारे दिली.

Advertisement

सीतारामन यांनी म्हटले, की देशात दिवसेंदिवस जाणीवपूर्वक कर्ज बुडविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. 31 मार्च 2021 अखेर हेतुपुरस्सर कर्ज बुडविणाऱ्यांची संख्या 2208 वरुन 2494 झाली आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची अनुत्पादक कर्जे (NPA) आणि बुडीत खात्यात नोंद झालेल्या पैशांपैकी 3,12,987 कोटी रुपये वसूल केले आहेत.

Advertisement

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी केंद्र सरकार अतिरिक्त नोटा छापणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्थमंत्री सीतारामन यांनी हा दावा फेटाळून लावला. आर्थिक गाडा सावरण्यासाठी नोटा छापण्याच्या केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे त्या म्हणाल्या.

Advertisement

मोदी सरकारने आपल्या हुडको (HUDCO) या सरकारी कंपनीतील 8 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थात्मक गुंतवणुकदारांनी मंगळवारपासून (ता. २७) त्यासाठी 45 रुपयांच्या समभागाप्रमाणे बोली लावण्यास सुरुवात केली होती. HUDCO चे 16.01 कोटी समभाग विकून केंद्र सरकारला 720 कोटी रुपयांची कमाई होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

ऑफर फॉर सेल (OFS) पद्धतीने ‘हुडको’च्या समभागांची विक्री केली जाणार आहे. हुडकोची स्थापना 25 एप्रिल 1970 रोजी झाली होती. यापूर्वीही केंद्र सरकारने विविध संस्थामधील आपली हिस्सेदारी विकून 7646 कोटी रुपये कमावले होते. त्यामध्ये 3651 कोटी रुपये OFS तर 3994 कोटी तर एक्सिस बँकेतील एसयुयुटीआयची हिस्सेदारी विकून 3994 कोटींची कमाई केली होती.

Advertisement

ठेवीदारांना दिलासा..! बॅंक बुडाल्यास जमा रकमेवर मिळणार ५ लाखांचा विमा, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय झाले..?
झोमॅटोच्या तेजीला ब्रेक..! शेअर बाजार गडगडला, कोट्यवधीचा फटका..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply