Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वंजारी समाज पदाधिकारी पंकजांवर ‘नाराज’; पहा नेमकी काय झालीय त्यांची भावना

जळगाव : खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भाजपच्या अंतर्गत सर्वात एकजूट असलेला मुंडे गट नाराज आहे. यानिमित्ताने या गटाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही नाराजी जाहीर करताना पक्षांतर्गत विरोधकांशी लढण्याची तयारी असल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गटाने सावध पवित्रा घेतला आहे. मात्र, दरम्यान पंकजांवरची नाराजी वाढत आहे.

Advertisement

दिव्य मराठीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थक, विशेषत: वंजारी समाज संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते अजूनही नाराज असून पंकजा यांनी पक्षत्याग करावा यासाठी त्यांच्यावर दबाव वाढवत आहेत. एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले असले तरी पंकजा यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा आग्रह हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत.

Advertisement

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे जागृत झालेल्या वंजारी समाजाचे मुंडे कुटुंबावर प्रेम आहे. त्यातूनच आपल्या नेत्याच्या मुलीला राजकीयदृष्ट्या त्रास दिल्याने हा समाज भाजपवर खूप नाराज झालेला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा यांचे नेतृत्व उदयाला येऊ नये म्हणून त्यांना एकनाथ खडसे यांच्यासारखी वागणूक देण्यात येत असल्याची कार्यकर्त्यांची भावना झालेली आहे.

Advertisement

त्यामुळेच खडसे यांनी ज्याप्रमाणे भाजपचा त्याग करून नवा मार्ग पत्करला, तसाच पंकजा यांनीही स्वीकारावा असे या पदाधिकाऱ्यांना प्रकर्षाने वाटते आहे. उद्धव ठाकरे हे पंकजा यांना बहीण मानतात. त्यांनी डाॅ. प्रीतम यांच्या विरोधात उमेदवारही दिला नाही. शिवसेना पंकजा यांना मंत्रिपद देईल, असा विश्वासही त्यांना वाटतो. काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी समाज माध्यमांवर मोहिमही सुरू केली.

Advertisement

Advertisement

Leave a Reply