Take a fresh look at your lifestyle.

ठेवीदारांना दिलासा..! बॅंक बुडाल्यास जमा रकमेवर मिळणार ५ लाखांचा विमा, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय झाले..?

नवी दिल्ली : मोदी सरकारने ठेवीदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोणतीही बँक दिवाळखोरीत निघाली वा तिचा परवाना रद्द झाल्यास, ठेवींवर पाच लाखापर्यंतची विमा भरपाई ९० दिवसांत खातेदाराला मिळणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाने ‘डीआयसीजीसी विधेयक-२०२१’ (डिपाॅझिट इन्शुरन्स अॅंड क्रेडीट गॅरंटी काॅर्पोरेशन) ला मंजुरी दिली. ज्यात विमा भरपाई रक्कम १ लाखावरून ५ लाख करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ठेवींवर सरकारकडून पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. मात्र एखादी बँक बुडाल्यास खातेदाराला त्याची जमापुंजी परत मिळेपर्यंत बराच अवधी लागतो. यामुळे सामान्य खातेदारांची परवड होते, हा मुद्दा लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने विमा भरपाईची प्रक्रिया जलद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय रिझर्व्ह बँकेने ज्या बँकावर निर्बंध लागू केले असतील, त्यांनाही लागू होणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

एखादी बँक संकटात सापडली, तर सुरुवातीच्या ४५ दिवसांत खातेदार, ठेवीदारांची माहिती गोळा केली जाईल, त्यानंतर ज्यांचे विमा दावे असतील, ते डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे सोपवले जातील. नंतर पुढील ४५ दिवसांत ठेवीदारांना त्यांची रक्कम सुपूर्द केली जाईल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Advertisement

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनअंतर्गत सर्व वाणिज्य बँक , विदेशी बँका त्यांच्या भारतातील सर्व शाखा, स्मॉल फायनान्स बँक, को-ऑपरेटिव्ह बँक, पेमेंट बँक यांचा समावेश आहे. या सर्व बँकांमधील ठेवींवर कोर्पोरेशनकडून पाच लाख रुपयांचा विमा दिला जातो. प्रत्येक बँकेचा विमा प्रीमियम वेगवेगळा आहे. यापूर्वी १०० रूपयांवर १० पैसे प्रीमियम आकारला जात होता तो आता १२ पैसे करण्यात आला असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

Advertisement

Leave a Reply