Take a fresh look at your lifestyle.

मोदी-शाह यांना भेटून-पाहून ममतादीदी शिकल्या ‘हे’; पहा राजकीयदृष्ट्या काय सूचित केलेय त्यांनी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालची सत्ता राखली आहे. त्यामुळे आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा चेहरा म्हणून अवघा देश त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. त्यांनीही व्यक्तीमत्वात काही बदल केले आहेत. त्यावर पत्रकारांनी प्रश्न केल्यावर ममतादीदी यांनी मोदी-शाह यांना भेटून-पाहून काही गोष्टी शिकल्याची कबुली दिली आहे.

Advertisement

संसद अधिवेशनादरम्यान पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आलेल्या ममतादीदी यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची निवासस्थानी भेट घेतली. तसेच सायंकाळी उशिरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ममतांची भेट घेतली. त्यामुळे त्या आता देशाच्या राजकारणात केंद्रासाठी आलेल्या आहेत. त्यातच पेगासस प्रकरणी त्यांनी चौकशी समिती नेमून केंद्रातील सत्ताधीश असलेल्या आणि कोणालाही न जुमानणाऱ्या भाजपला थेट आव्हान दिले आहे.

Advertisement

चालू राजकीय स्थिती, पेगासस हेरगिरी, कोरोनाची स्थिती आणि विरोधकांची एकजूट या मुद्द्यांवर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचे ममतादीदी यांनी म्हटले आहे. तसेच भेट चांगली झाली. तिचे सकारात्मक परिणाम दिसतील असे सांगताना भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मी एकटी काही करू शकत नाही. मी ज्योतिषी नाही. चेहरा थोपवण्याची इच्छा नाही. विरोधकांकडून दुसरा चेहरा आला तरी मला अडचण नाही, असेही स्पष्ट सांगून टाकले आहे.

Advertisement

विरोधकांच्या आघाडीसाठी सर्वांनी गंभीरपणे काम केले तर सहा महिन्यांतच परिणाम दिसू शकतात. सोनियांनाही विरोधकांची एकजूट हवी आहे, असे स्पष्ट सांगताना व्यक्तीमत्वात झालेल्या बदलाबाबत ममतादीदी यांनी खुल्या दिलाने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदींना पाहून माझी हिंदी भाषा सुधारली आणि शहांना पाहून गुजराती समजू लागली आहे. एकूणच आता अवघ्या देशाला साद देण्यासाठी हिंदी भाषा शिकून घेतल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply