Take a fresh look at your lifestyle.

म्हणून बांबू शेतीतून येणार अच्छे दिन; पहा नेमके काय म्हटलेय पाशा पटेलांनी

सोलापूर : बांबू लागवड, त्याचे फायदे, बांबू लागवडीचे तंत्रज्ञान यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी खूप महत्वाची माहिती दिली आहे. या वृक्षपिकाच्या लागवडीतून भविष्यात कोणती क्षेत्र खुली होतील यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे.

Advertisement

उस्मानाबाद येथे आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, भविष्य काळाचा विचार करता बांबूची शेती ही सर्वार्थाने फायद्याची ठरणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे.  २०१५ च्या पॅरिस करारामुळे भूगर्भातील दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या ज्वलनास बंदी घालण्यात आलेली आहे. त्याऐवजी जमिनीवर उगवलेले शेतातील उत्पादन जाळण्याच्या तरतुदींचा विचार केला तर आगामी काळात परळी येथील थर्मलमध्येही दगडी कोळसा जाळता येणार नाही. त्याऐवजी बांबूचा वापर करता येऊ शकतो. एकट्या परळी थर्मलचा विचार केला तर त्यासाठी किमान २ लाख एकर बांबूची गरज लागेल.

Advertisement

बांबूपासून इथेनॉलची निर्मितीही केली जाते. पूर्वी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिसळले जात असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता हे प्रमाण २० टक्के करण्यास परवानगी दिली आहे. २०२७ पर्यंत वाहने १०० टक्के इथेनॉलवर चालवली जातील. आजघडीला बांबूपासून फर्निचर, ब्रश, कपडे, लोणचे अशा असंख्य वस्तू तयार केल्या जात आहेत. त्यामुळे बांबू हा कल्पवृक्षच आहे. भविष्यात बांबूची मागणी वाढणार असेही पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, इंद्रजित देवकते, शिवाजी गिड्डे, राजसिंह राजेनिंबाळकर, पांडुरंग पवार, नाना कदम तसेच तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, शेतकरी बांधव आदि या बांबू शेती संदर्भात बैठकीस उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

Leave a Reply