Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ दोघा अधिकाऱ्यांच्या तपासामुळे नगर जिल्हा चर्चेत; पहा नेमकी काय आहेत प्रकरणे

अहमदनगर : गुन्हेगारी व वाळूतस्करीसह सध्या करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसाठी अहमदनगर जिल्हा राज्यभरात चर्चेत आहे. त्याचवेळी आणखी दोन प्रकरणातील तपासामुळे महाराष्ट्र राज्यातील आकाराने सर्वात मोठा असलेला हा जिल्हा चर्चेत आहे. त्याला निमित्त मिळाले आहे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दोन प्रकरणाचे.

Advertisement

माजी गृहमंत्री अाणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण पथकाने (सीबीअाय) बुधवारी राज्यातील अाठ शहरांमध्ये १२ ठिकाणी छापे टाकले. त्यातही नगर जिल्हा चर्चेत आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट सहायक पोलिस अायुक्त संजय पाटील यांच्या मुंबई-पुणे अाणि पोलिस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगर येथील मालमत्तांवरही धाडी टाकण्यात आल्याने खळबळ उडली आहे.

Advertisement

तर, वाळू उपसा करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांच्याकडून लाच मागण्याच्या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला आहे. महसूल विभागाचे कारनामे यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रासाठी आलेले आहेत. राशिनकर यांना सकाळी नऊच्या सुमारास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांच्या भूम येथील घराची झडती घेतली. मात्र, त्यात काहीही आढळले नाही. नगरमध्येही तेथील टीममार्फत तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशांत संपते (उपविभागीय पोलिस अधिकारी, एसीबी, उस्मानाबाद) यांनी दिलेली आहे.

Advertisement

वाळू ठेकेदाराला वाळू उपसा व वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या भूमच्या उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा राशिनकर या नगर जिल्ह्यातील आहेत. एकूणच नगरमध्ये यामुळे दोन ठिकाणी वेगवेगळे तपास चालू आहेत. त्याचीच चर्चा वेगाने होत आहे. दरम्यान, खंडणीप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि इतर ७ पोलिसांची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) अहमदनगरमध्ये आल्याने अनेकांना धडकी भरली आहे. या गंभीर गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी २५ जुलै रोजी मुंबईचे पोलिस अायुक्त हेमंत नगराळे यांनी एसआयटी स्थापन केल्याने यातून आणखी पुढे काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply