Take a fresh look at your lifestyle.

एटीएममधून पैसे काढणे महागले..! रिझर्व्ह बॅंकेने काय बदल केलेत, ते जाणून घेण्यासाठी वाचा..!

नवी दिल्ली : कोणत्याही बॅंकेचे एटीएम कार्ड तुमच्याकडे असल्यास तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने एटीएम कार्ड वापरावरील शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे,  येत्या 1 ऑगस्ट 2021 पासूनच हे नवे दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे एटीएम कार्ड वापरताना आता काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा तुमचा खिसा (बॅंक खाते) खाली होण्याची शक्यता आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. त्यानुसार एटीएमद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारावरील शुल्कात वाढ केली आहे. ‘आरबीआय’ने फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन 17 रुपये, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये शुल्क केले आहे.

Advertisement

हे नवे दर 1 ऑगस्टपासूनच लागू होणार आहेत. ‘आरबीआय’च्या मते, इंटरचेंज शुल्क ग्राहकाने क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास मर्चंट बँकेला लागू होतात. कार्ड इश्यू करणारी बँक इंटरचेंज फी पे करते. हे शुल्क बँका आणि एटीएम कंपन्यांमध्ये नेहमीच वादाचा विषय ठरले आहे. सध्या हे इंटरचेंज शुल्क वित्तिय व्यवहारांसाठी 15 रुपये, तर गैरवित्तिय व्यवहारांसाठी 5 रुपये आहे.

Advertisement

बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला ग्राहकांना 5 ट्रान्झॅक्शन मोफत करता येतात. त्यात वित्तिय आणि गैर वित्तिय व्यवहारांचा समावेश आहे. त्यानंतर तुम्ही ट्रान्झॅक्शन केल्यास त्यावर साधारणत: 20 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन शुल्क आकारलं जातं.

Advertisement

दुसऱ्या बँकेच्या एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये 3, तर नॉन मेट्रोसिटीमध्ये 5 ट्रान्झॅक्शन फ्री आहेत. आरबीआयने आता ही इंटरचेंज फी 20 रुपयांवरुन 21 रुपये केली आहे. हा बदल मात्र 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले आहे.

Advertisement

मोदी सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार का, पाहा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे..?
म्हाताऱ्या आई-बापाला घराबाहेर काढता येणार नाही..! मुलगा व सुनेलाच बाहेर हाकला.. पाहा उच्च न्यायालयाने निकालात काय म्हटलेय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply