Take a fresh look at your lifestyle.

झोमॅटोच्या तेजीला ब्रेक..! शेअर बाजार गडगडला, कोट्यवधीचा फटका..!

मुंबई : जगभरातील प्रमुख शेअर बाजार आज गडगडले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा जीडीपी कमी केल्याचा परिणाम आज सकाळी बाजार सुरु होताच दिसला. गुंतवणुकदारांनी नफावसुलीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीला मोठी झळ बसली. तेजीने वधारलेल्या शेअरची विक्री करून नफेखोरांनी कमाई केल्याने आज सेन्सेक्स ४५० अंकांनी, तर निफ्टीत १३५ अंकांची घसरण झाली. त्यामुळे किमान ५० हजार कोटींचे नुकसान झाले. बँका, वित्त संस्था, एफएमसीजी या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी विक्री केली.

Advertisement

सेन्सेक्समध्ये ३० पैकी २३ शेअर घसरले. त्यात डॉ. रेड्डी लॅब, एल. अँड टी., एचडीएफसी, टीसीएस, भारती एअरटेल, टाटा स्टील, पॉवरग्रीड, एसबीआय, बजाज ऑटो, रिलायन्स, इन्फोसिस, टायटन, एशियन पेंट, एचडीएफसी बँक या शेअरला मोठी झळ बसली. इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा हे शेअर तेजीत होते.

Advertisement

शेअर बाजारात एंट्री केल्यापासून सुसाट निघालेल्या झोमॅटोच्या तेजीलाही आज ब्रेक बसला. गुंतवणूकदारांनी नफा कमाईवर लक्ष दिल्याने झोमॅटोचा शेअर ६ टक्क्यांनी घसरला. सध्या बीएसईवर झोमॅटोचा शेअर १२६.३० रुपये असून, त्यात ४.७५ टक्के घसरण झाली, तर एनएसईवर तो १२६.१० रुपये असून, त्यात ५.१२ टक्के घसरण झाली.

Advertisement

फार्मा शेअरलाही आज विक्रीची झळ बसली. जीएसके फार्मा, टोरेंट फार्मा, आरती इंडस्ट्रीज, सिप्ला, आलेम्बिक फार्माच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला असून, तो ५२१२७ अंकावर ट्रेड करत आहे. निफ्टी १३५ अंकांच्या घसरणीसह १५६१० अंकावर आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा चालू वर्षाचा जीडीपी अंदाज ९.५ टक्के इतका कमी केला. याआधी १२.५ टक्के जीडीपी राहील, असे नाणेनिधीने म्हटले होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा लॉकडाउन केल्याने मोठे नुकसान झाल्याचे नाणेनिधीने म्हटलं आहे.

Advertisement

मोदी सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार का, पाहा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे..?
डाळिंब मार्केट अपडेट : पहा कुठे गेलाय भाव थेट 205 रुपये / किलोवर; राज्यात आहे अशी स्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply