Take a fresh look at your lifestyle.

अर्र..‘एचटीबीटी’चे आहेत असे घातक दुष्परिणामही; पहा नेमके काय म्हटलेय पवारांनी

पुणे : राज्यात ३६% म्हणजे १० लाख हेक्टरवर प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक दावा शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष व आंदोलनाचे प्रणेते ललित बहाळे यांनी केला आहे. संघटनेच्या जीएम बियाणे माहिती व तंत्रज्ञान केंद्रावर १२ हजार शेतकऱ्यांनी संपर्क साधत बियाणे घेतल्याचे त्यांनी सांगितल्याने आता यावर कृषी विभाग कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

त्यातच अशा पद्धतीने जीएम बियाणे लागवड करून मिळणाऱ्या फायद्यांचा पाढा शेतकरी संघटना वाचत आहे. तर, कृषी वैज्ञानिक विचार मंचचे प्रवर्तक तसेच भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबईचे निवृत्त शास्त्रज्ञ शरद पवार यांनी हे बियाणे पर्यावरण आणि जैविक आरोग्यास खूप घातक असल्याचे म्हटलेले आहे. राज्यात प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे विक्री केल्याबद्दल १८,६७१ पाकिटे व ४९६४ किलो खुले बियाणे जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत २ कोटी ३५ लाख २९ हजार इतकी होते असे कृषी विभागाने म्हटलेले आहे.

Advertisement

कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर यांनी याबाबत माहिती देताना कृषी विभागाकडून कारवाई करताना त्रुटी राहत असल्याची कबुली दिली आहे. निवृत्त शास्त्रज्ञ शरद पवार यांनी या बियाण्यांना करोना विषाणूपेक्षा भयंकर म्हटलेले आहे. एचटीबीटी तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या कुटुंबावर, शेतमजुरांवर आणि त्याचे तेल किंवा धान्य आहारात वापरणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पार्किन्सन आणि कर्करोगाला सामोरे जावे लागते. त्यामुळे रत सरकारने तणनाशक प्रतिरोधक वाणावर लादलेली बंदी आवश्यक असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply