Take a fresh look at your lifestyle.

भयंकर की.. तीन कृषी कंपन्यांवर कारवाई; ‘ग्रीन इंडिया’ जोमात, शेतकरी थेट कोमात..!

सोलापूर / पुणे : राज्यात शेतकऱ्यांचे वाटोळे करण्यासाठी टपलेल्या भामट्यांवर वाचक ठेवण्यात कृषी विभाग कमी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे जोमात आहेत. अशावेळी कृषी विभाग कुठेतरी किरकोळ कारवाई करून दिवस ढकलत आहे. अशावेळी सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी छापा टाकून तीन कंपन्यांवर कारवाईची कमाल याच कृषी विभागाने करून दाखवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे.

Advertisement

आष्टी (मोहोळ) येथील पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या ग्रीन इंडिया यांच्या दुकानावर छापा टाकण्याची कार्यवाही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने करून दाखवली आहे. इमामेक्टिन बेंझोएट या कीटकनाशकासह इतर सहा औषधांचा तीन लाख ८३ हजार ८८५ रुपयांचा साठा यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. नोंदणी प्रमाणपत्र, उत्पादन विक्री व साठवणूक परवाना नसतानाही शेतकऱ्यांना दणक्यात कृषी निविष्ठा विक्रीचा गोरखधंदा यामुळे उघडकीस आलेला आहे.

Advertisement

जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सागर बारवकर व गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तीन कंपन्यांसह दुकान चालक सिद्धेश्वर मच्छिंद माने (रा. आष्टी) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यावेळी इमामेक्टिन बेंजोएट, ग्रीन केएम, ग्रीन एक्साइड, एम गोल्ड, फंगीस, टॉप नील, ग्रीन झायमी अशा एकूण सात प्रकारच्या कीटकनाशक, औषधांच्या सीलबंद प्लास्टिक बाटल्या आढळल्या आहेत.

Advertisement
कीटकनाशक कायदा, खत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेल्या कंपन्या अशा :
अॅडन क्रोप केअर को., राजकोट, अहमदाबाद
आनंद अॅग्रो केअर, आंबेगाव पठार, ता. हवेली, जि. पुणे
ग्रीन इंडिया अॅग्रो स्ट्रक्चर, ता. हवेली, जि. पुणे

 

Advertisement

Advertisement

Leave a Reply