Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार का, पाहा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे..?

नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेत असताना, तत्कालिन केंद्र सरकारनं 2008-09 मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. देशातील शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. मोदी सरकार शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी केंद्राकडून अनेक योजनाही राबविल्या जात आहेत. मात्र, मोदी सरकार शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

Advertisement

केंद्रीय वित्तमंत्री भागवत कराड यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या प्रश्नाला उत्तर देताना, केंद्र सरकारचा सध्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट सांगितले. नाबार्डकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, देशातील शेतकऱ्यांवर 16.8 लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती कराड यांनी दिली. सर्वाधिक कर्ज तमिळनाडूमधील शेतकऱ्यांवर आहे. या राज्यातील शेतकऱ्यांवर 1.89 लाख कोटींचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

राज्यांवर असणारे कर्ज
तमिळनाडू : 189623.56 कोटी रुपये
आंध्र पद्रेश : 169322.96 कोटी रुपये
उत्तर प्रदेश: 155743.87 कोटी रुपये
महाराष्ट्र : 153658.32 कोटी रुपये
कर्नाटक : 143365.63 कोटी रुपये

Advertisement

सर्वात कमी कर्ज असणारी राज्य
दमन आणि दीव : 40 कोटी
लक्षद्वीप : 60 कोटी
सिक्कीम : 175 कोटी
लडाख : 275 कोटी
मिझोरम : 554 कोटी

Advertisement

पंजाब सरकारकडून कर्जमाफीची घोषणा
पंजाबमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यानुसार पंजाब सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे 590 कोटी रुपयांचे कर्ज माफ करीत असल्याचे जाहीर केलंय.

Advertisement
Advertisement

Leave a Reply