Take a fresh look at your lifestyle.

फळबागेच्या खतव्यवस्थापनात लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; खर्चात बचतीचे महत्वाचे मुद्दे वाचा की..

राज्यामध्ये सन १९९०-९१ पासून रोजगार हमी अंतर्गत १०० टक्के अनुदानित फळझाड लागवड हि महत्त्वाकांक्षी योजना सुरु झाली. तेंव्हा पासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनावर रुजली. फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरल, अस म्हटल तर वावग ठरू नये.राज्यात  आता पर्यंत 19  लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा उभ्या आहेत. परंतु अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही ही वस्तूस्थिती आहे.

Advertisement
लेखक :  डॉ. आदिनाथ ताकटे (मो.९४०४०३२३८९)

Advertisement

मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी

फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाची फळे येण्यासाठी जमिन सुपिक ठेवणे जरुरीचे आहे.फळझाडांची वाढ आणि त्यावर होणारी फलधारणा जमिनीतून मिळणाऱ्या पोषक अन्नंद्रव्यावर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते त्यामुळे या दोन महत्वाच्या बाबीपैंकी  जमिनीच्या सुपिकतेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.सुपिकतेकडे दुर्लक्ष केल्यास झाडांची वाढ कमी होते आणि झाडे कीड व रोगास बळी पडतात.झाडाच्या निकोप वाढ व्हावी म्हणून योग्य मशागत, तणांचा बंदोबस्त,खतांचा संतुलित वापर,सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन,आंतरपिके  आणि पाणी व्यवस्थापन,इत्यादी मार्गांनी जमिन सुपिक ठेवणे फायद्याचे ठरते. फळझाडांच्या लागवडीचे यशापयश हे जमीन, हवामान, खत व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा यावर विशेष अवलंबून आहे.यापैकी जमिन आणि  खत व्यवस्थापनास अन्यन्य साधारण महत्व आहे.

Advertisement

जमीन कोणत्या प्रकारची आहे, हलकी, मध्यम कि भारी हे सर्वाना परिचित असतेच.जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी.जमिनीची खोली किती आहे? जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे? जमिनीचा  निचरा कसा आहे? त्याचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी.फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी १ मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमिन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत,मध्यम पोताची जमिनीचा सामू ६ ते ७.५  पर्यंत असावा.मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा  कमी असावे. जमिनीचा उतार २ ते ३ टक्क्यापेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे,त्या ठिकाणच्या मातीचे  परिक्षण करून घेणे आवश्यक आहे. 

Advertisement

योग्य जमिनीतच फळझाड लावा !

Advertisement
अ.न. जमिनीचा प्रकार फळपिके
१. हलकी ते मध्यम अंजीर,पेरु,डाळिंब,कागदीलिंबू,द्राक्षे,पपई,सीताफळ,बोर,करवंद,जांभूळ, कवठ,चिंच
२. मध्यम चिकू,आंबा,संत्री,मोसंबी,काजू,नारळ
३. भारी केळी

 

Advertisement

फळबागे करिता मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार प्रातिनिधिक नमुना घ्यावा. सर्वप्रथम ३ X ३ X ३ फुट खोलीचा (१०० से.मी) किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटातील प्रतिनिधिक नमुना काढावा व तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून  तपासणी साठी पाठवावा.माती परीक्षणाप्रमाणेच पाण्याची तपासणी करणे आवश्यक आहे.आपले विहिरीचे/ बोअर चे पाणी क्षारयुक्त वा मचूळ असू नये ते गोड असावे. तेव्हा माती बरोबरच,पाण्याचेही रासायनिक परिक्षण करून घ्यावे आणि त्या अनुषंगानेच फळझाडांची निवड करावी.

Advertisement

फळझाडांना खते केव्हा आणि कशा पद्धतीने द्यावीत?

Advertisement

सर्वसाधारणपणे फळझाडांना जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी मध्ये खते द्यावीत.परंतु खते देताना प्रत्येक फळझाडांचा बहार येण्याचा व फळे पक्व होण्याचा कालवधी लक्षात घेऊन खतेद्यावीत.सर्वसाधरणपणे जून-जुलै महिन्यात संपूर्ण शेणखत, संपूर्ण स्फूरद व पालाशची मात्रा द्यावी व नत्राची मात्रा एक किंवा दोन हप्त्यात विभागून द्यावी.खताची मात्रा देताना बांगडी पद्धतीने द्यावीत. मध्यान्ही झाडाची सावली जेवढ्या भागावर पडेल  त्या क्षेत्राच्या मधोमध १ ते १.५ मीटर दूर,१५ से. मी. खोल आणि ३० ते ४० से.मी. रुंद चर घेऊन गोलाकार पद्धतीने द्यावीत प्रथम चरात पालापाचोळा व शेणखत टाकून नंतर रासायनिक खते सर्व  बाजूनी सारखी टाकावी नंतर चर मातीने बुजवावा.

Advertisement

विविध फळझाडांच्या  वाण व  लागवडीचे अंतर:

Advertisement
अ.न. फळझाड वाण लागवडीचे अंतर (मी) हेक्टरी झाडे
१. आंबा केशर, हापूस,रत्ना,तोतापुरी,नीलम,पायरी,लंगडा,वनराज, सिंधू, लालबाग, १० X १० १००
२. नारळ बाणवली, प्रताप, टी x डी ,डी X टी, ग्रीन डॉर्फ,ऑरंज डॉर्फ, यलो डॉर्फ ७.५ X ७.५ १७७
३. चिकू कालीपत्ती,  पिली पत्ती,क्रिकेटबॉल १० X १० १००
४. पेरू सरदार (एल -४९), ललित, अलाहाबाद, सफेद, श्वेता ६ X ६ २७७
५. सीताफळ बाळानगर, फुले पुरंदर, फुले जानकी ५ X ५ ४००
६. आवळा कृष्णा, कांचन , चकैया व निलम ७ X ७ २०४
७. चिंच  पीकेएम-२६३, प्रतिष्ठान, अकोला स्मृती , अजिंठा  गोड  चिंच १० X १० १००
८. जांभूळ स्थानिक, कोकण बहाडोली १० X १० १००
९. अंजीर पुन फिग,दिनकर,फुले राजेवाडी ४.५ x ३ ७४०
१०. कवठ एलोरा १० X १० १००
११. बोर उमराण,कडाका, चुहारा ,मेहरूण  नरेंद्र बोर -१ ५ X ५ ४००

 

Advertisement

आंबा जमिन व खत व्यवस्थापन:

Advertisement

लालसर पोयट्याची जमिन उत्तम.जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा’ चुनखडीचे प्रमाण १०% पेक्षा कमी असावे.चोपण जमिन,खूप हलकी,कठीण मुरूम,पाषण असणारी जमिनी अयोग्य. डोंगर उताराच्या जमिनीवर आंब्याचे उत्पादन कमी मिळते.खूप खोलीच्या,चिकणमाती जास्त असणाऱ्या जमिनीत आंबा लागवड टाळावी

Advertisement

पूर्ण वाढ झालेल्या ( १० वर्ष)  आंब्याच्या झाडास ५० किलो शेणखत , १५०० ग्रॅम  नत्र , ५०० ग्रॅम  स्फूरद आणि ५०० ग्रॅम पालाश म्हणजेच  सर्वसाधारणपणे ३ किलो युरिया, ३ किलो, सिंगल सुपर फॉसपेट आणि १ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे.सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात निम्मे नत्र,संपूर्ण स्फूरद आणि पालाश दयावे.उर्वरित नत्र सप्टेंबर महिन्यात दयावे.

Advertisement

चिकू जमिन व खत व्यवस्थापन:

Advertisement

विविध प्रकारच्या जमिनीत लागवड शक्यउत्तम निचरा होणारीजमिनीचा सामू ६ ते ८ पर्यंत असावा. खोल जमिन,वालुकामय पोयटा,रेताड जमिन, खारवट जमिनी सुद्धा चालते. उथळ जमिन, कडक मुरूम, पाषण आणि चुनखडी असणाऱ्या जमिनीत चिकूची लागवड करू नये.पाण्याचा निचरा होणारया क्षारांना चिकू सहनशील.

Advertisement

पूर्ण वाढलेल्या झाडास १०० किलो शेणखत,(३०००:२०००:२००० ग्रॅम नत्र: स्फुरद : पालाश प्रति झाड)  ३ किलो नत्र, २ किलो स्फूरद आणि २ किलो पालाश दयावे..म्हणजेच ६.५०  किलो युरिया,१२.५०  किलो सिंगल सुपर फॉसपेट आणि ३.५  किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे. जून व सप्टेंबर महिन्यात विभागून दयावे

Advertisement

नारळ जमिन व खत व्यवस्थापन:

Advertisement

पाण्याची उपलब्धता असल्यास सर्व प्रकारच्या जमिनीत नारळाची लागवड करता येते .समुद्रकिनाऱ्याच्या वालुकामय जमिनीत,नदीकाठच्या रेताड जमिनीत, डोंगर उताराकडच्या वरकस जमिनीत तसेच कातळावरही करता येते

Advertisement

५ वर्षाच्या नारळाच्या झाडास ५० किलो शेणखत,१ किलो १०००:५००:१००० ग्रॅम नत्र:स्फूरद:पालाश प्रती झाड म्हणजेच २.२५ किलो युरिया,३ किलो सिंगल स्फूरद फॉसपेट आणि २ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे.

Advertisement

नत्र व पालाश म्हणजेच युरिया व म्युरेट ऑफ पोटॅश ही खते जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात समान हप्त्यात द्यावी. संपूर्ण सिंगल सुपर फॉसपेट जुने-जुलै महिन्यातच दयावे.

Advertisement

पेरू जमिन व खत व्यवस्थापन:

Advertisement

हलकी,वालुकामय पोयटा व चिकण युक्त पोयटा जमिन उत्तम असतात नदीकाठच्या जमिनीत चांगले उत्पादन येते.सामू ४.५ ते ८.२ असावा.क्षारास थोड्या प्रमाणात सहनशील

Advertisement

पूर्ण वाढलेल्या झाडास ५० किलो शेणखत, ९००:३००:३०० ग्रॅम नत्र:स्फूरद:पालाश प्रती झाड दयावे.यापैकी निम्मे नत्र (४५० ग्रम) बहराच्या वेळी व उर्वरित फलधारणेच्या  वेळी दयावे,तर  स्फूरद व पालाश एकाच हप्त्यात बहारच्या वेळेस दयावे.सर्वसाधारणपणे २ किलो युरिया, २ किलो किलो सिंगल स्फूरद फॉसपेट आणि १/२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे.

Advertisement

सीताफळ जमिन खत व्यवस्थापन:

Advertisement

मुरमाड,डोंगराळ  जमिन, हलकी ते भारी उत्तम निचऱ्याची चिकणमाती असणाऱ्या जमिनीत लागवड करू नये .जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.

Advertisement

सीताफळाच्या पूर्ण वाढलेल्या झाडास ( वर्ष ५) ५०  किलो शेणखत २५०:१२५: १२५ ग्रॅम नत्र:स्फूरद: पालाश प्रती झाड म्हणजेच  सर्वसाधरणपणे १/२  किलो युरिया, ८०० ग्रॅम सिंगल सुपर फॉसपेट आणि २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटश जून-जुलै महिन्यात दयावे.उर्वरित नत्राचा अर्धी मात्रा पावसाचा अंदाज घेऊन पहिल्या मात्रेनंतर एक महिन्यांनी किंवा फुलोरा धरताना द्यावा.

Advertisement

बोर जमिन व खत व्यवस्थापन:

Advertisement

सर्व प्रकारच्या जमिनीत,अत्यंत हलक्या,मुरमाड,डोंगर उताराच्या जमिनीपासून ते रेताड वालुकामय गाळाच्या पोयटायुक्त खोल,कसदार ,भारी जमिनीत योग्य निचरा असल्यास पीक चांगले येते.थोड्याशा पाणथळ आणि क्षारयुक्त जमिनीतही बोर चांगले येऊ शकते.

Advertisement

पूर्ण वाढलेल्या झाडास ५० किलो शेणखत,२५०:२५०:५० ग्रॅम नत्र: स्फूरद :पालाश् प्रती झाड म्हणजेच ५५० ग्रॅम युरिया, दीड किलो सिंगल सुपर फॉसपेट आणि १०० ग्रॅम  म्युरेट ऑफ पोटश जून-जुलै मध्ये दयावे.अर्धे नत्र फळधारणा सुरु झाल्यावर ऑगस्ट –सप्टेंबर महिन्यात दयावे.

Advertisement

अंजीर जमिन व खत व्यवस्थापन :

Advertisement

अंजीर फळपिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम पाण्याचा निचरा होणारी जमिन लागते.जमिनीची खोली ६० ते ९० से.मी. व सामू ७.५ असावा.अंजीर लागवडीसाठी सुपीक,पाण्याचा निचरा होणारी जमिन मानवते.

Advertisement

पूर्ण वाढलेल्या ( ५ वर्ष)  झाडास ४० ते ५० किलो शेणखत ,९०० :२५०:२७५ २५०:२५०:५० ग्रॅम नत्र: स्फूरद :पालाश् प्रती झाड म्हणजेच सर्वसाधारणपणे २ किलो  युरिया, दीड किलो सिंगल सुपर फॉसपेट आणि १/२  किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रती झाड द्यावे. नत्र दोन फ्प्त्यात विभागून द्यावे.

Advertisement

आवळा,चिंच,जांभूळ जमिन व खत व्यवस्थापन:

Advertisement

आवळा : कोणत्याही प्रकारच्या जमिनीत अत्यंत हलकी, खडकाळ, भरड, गाळाची व भारी ,क्षारपड जमिन

Advertisement

चिंच : हलक्या, निकृष्ट, बरड माळरानाच्या जमिनीत मध्यम काळ्या भारी, सुपीक जमिनीत

Advertisement

जांभूळ: वरकस जमिन, मध्यम ते भारी जमिनीत

Advertisement

पूर्ण वाढलेल्या आवळा, चिंच व जांभूळ या फळपिकांना  झाडास ५ वर्षानंतर ५० किलो शेणखत,५००: २५०:२५० ग्रॅम नत्र :स्फूरद : पालाश दयावे.नत्र दोन  हप्त्यात विभागून दयावे.म्हणजेच १ किलो युरिया,१.५ किलो दीड किलो सिंगल सुपर फॉसपेट आणि १/२  किलो म्युरेट ऑफ पोटॅश जुन-जुलै महिन्यात व उर्वरीत नत्र सप्टेंबर मधे द्यावे.

Advertisement

कवठ जमिन व खत व्यवस्थापन:

Advertisement

मध्यम  ते भारी ,उत्तम निचऱ्याची जमिन निवडावी.हे फळझाड खऱ्या किंवा चोपण जमिनीतही चांगले येते. पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत व,८०० ग्रॅम  युरिया,१६०० ग्रॅम सिंगल सुपर फॉसपेट आणि ४०० ग्रम  म्युरेट ऑफ पोटॅश जुन-जुलै महिन्यात व उर्वरीत नत्र सप्टेंबरमधे द्यावे.

Advertisement

योग्य जमिनीची निवड/माती परीक्षण, सेंद्रिय खते,हिरवळीची खते, निबोळी पेंड ,जैविक खतांचा वापर , वेळेवर व योग्य खतांची मात्रा, रासायनिक खतांचा संतुलित वापर, आंतर मशागत- आंतर पिके ,पाणी व्यवस्थापन या सर्व बाबी लक्षात घेऊन  योग्य नियोजन केल्यासं  फळबाग नक्कीच फायद्याची ठरेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply