Take a fresh look at your lifestyle.

वाचा खरीप नियोजनामधील महत्वाची माहिती; योग्य वेळी ‘अशी’ करा खरीप पिकांची आंतरमशागत..!

राज्यात यंदाच्या वर्षी बहुतांश ठिकाणी वरुणराजाने जून महिन्यात हजेरी लावल्याने ५०% हुन अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, तूर, सूर्यफूल, मुग, उडीद, मटकी, हुलगा, चवळी, भुईमुग तसेच भाजीपाला पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.पेरलेल्या पिकांमध्ये सध्या आंतरमशागतीची कामे करणे अंत्यंत गरजेचे आहे.यामध्ये नांग्या भरणे, विरळणी, कोळपणी, खुरपणी, खांदणी, वर खतांची मात्रा देणे  इत्यादी आंतरमशागतीची कामे योग्य वेळी आणि योग्य प्रकारे त्वरित करणे गरजेचे आहे.त्यासाठी शेतकरी बंधूनी कोणत्या पिकात केव्हा, कशा प्रकारे आंतर मशागत करावी याविषयीचे मार्गदर्शन केले आहे.

Advertisement

लेखक : डॉ. आदिनाथ ताकटे (मो.९४०४०३२३८९) मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

Advertisement

नांग्या भरणे:पेरणीनंतर बऱ्याच वेळा उगवण निट न झाल्यामुळे वाफ्यात,साऱ्यात रिकाम्या जागा दिसतात,अशा वेळी टोकण पद्धतीने किंवा रोपांची लागवड करावी.साधारणतःपेरणी नंतर ८-१० दिवसात नांग्या भराव्यात,जेणेकरून आधीच्या आणि नंतर लावलेल्या पिकांच्या वाढीत जास्त फरक पडत नाही.यामुळे रोपांची हेक्टरी संख्या योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते.

Advertisement

विरळणी: बऱ्याच वेळा दाट पेरणीमुळे योग्य अंतर राहत नाही.पेरणी नंतर १०-१२ दिवसांनी व २२-२५ दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी.यामुळे या रोपातील अंतर योग्य राहते.

Advertisement

कोळपणी:तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच मातीतील ओलावा टिकविण्यासाठी कोळपणी करणे गरजेचे ठरते.तणांच्या प्रादुर्भावानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार साधारणतः २ ते ३ कोळपण्या पेरणी नंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाचव्या-सहाव्या आठवड्यापर्यंत कोळपणी करावी.कोळपणीसाठी विविध प्रकारची पिकानुसार कोळपी उपलब्ध आहेत.त्याचा वापर करावा.

Advertisement

खुरपणी/निंदणी: तणांमुळे पिकाला अन्नद्रव्य,पाण्याची कमतरता भासते.कीड,रोगाचा प्रादुर्भाव वाढतो,उत्पादनात घट येते.यासाठी तणांचा प्रादुर्भाव कमी करून पीक तणरहित  ठेवणे गरजेचे आहे.साधारणतः २ ते ३ खुरपण्या पिकानुसार आणि तणांच्या प्रादुर्भावानुसार कराव्यात.वेळेअभावी अथवा मजुरांअभावी खुरपणी शक्य नसल्यास रासायनिक तण नियंत्रके वापरून तणांचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

Advertisement

खांदणी: जमिनीत वाढणाऱ्या भागांची वाढ नीट होण्यासाठी रोपांच्या,पिकांच्या बुंध्याला किंवा बुडाला मातीची भर दिली जाते.खांदणी मुख्यतःउस,आले,बटाटा हळद,उपटया भुईमूग इत्यादी पिकांसाठी केली जाते.उसासाठी खांदणी  ही महत्वाची आंतरमशागत आहे,यामुळे पाणी एकसारखे बसते,शिवाय पीकही लोळत नाही.उसासाठी दोन ते अडीच महिन्यांनी बाळबांधणी व ४-५ महिन्याचे पीक होताच पक्की बांधणी करावी.

Advertisement

वर खतांचा वापर:पेरणी झाल्यानंतर पिकांच्या वाढीच्या अवस्थानुसार आणि गरजेनुसार विशेषतः नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो.खुरपणी किंवा कोळपणी झाल्यानंतर खत मातीत मिसळले जाईल या पद्धतीने द्यावे.मात्र खत दिल्यानंतर पिकाला पाणी द्यावे.

Advertisement

आच्छादनाचा वापर:पेरणी केल्यानंतर तीन आठवड्यांनी पिकांच्या दोन ओळीत सेंद्रिय पदार्थांचे उदा.गव्हाचे काड,बाजरीचे सरमाड,तूरकाठ्या,ज्वारीची धसकटे,उसाचे पाचट,पिकांचा टाकाऊ भाग इत्यादी आच्छादक म्हणून  वापरावे.साधारणपणे प्रती हेक्टरी ५ टन या प्रमाणात सेंद्रिय

Advertisement

आच्छादकाचा वापर करावा.आच्छादकामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे,तणांचा प्रादुर्भाव कमी करणे,जमिनीचे तापमान नियंत्रित राखणे इत्यादी फायदे होतात.

Advertisement

 

Advertisement
आंतरमशागतीची कामे उरका!

Advertisement

पिकाच्या निरोगी,जोमदार वाढीसाठी आंतरमशागतीची कामे वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे.

Advertisement

आंतरमशागत केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

Advertisement

माती भूसभुशीत होते.जमिनीतील ओलावा टिकविण्यास मदत होते.

Advertisement

मातीचा वरचा थर सैल होऊन मातीला पडलेल्या भेगा बुजल्या जातात.त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.

Advertisement

आच्च्दानाचा वापर केल्याने बाष्पीभवनाद्वारे होणारी पाण्याची कमतरता कमी होते.

Advertisement

पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते.याचा फायदा पिकाबरोबरच जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या कार्यासाठी होतो.

Advertisement

आंतरमशागतीमुळे  नको असलेल्या मुळांची छाटणी होते.

Advertisement

किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

Advertisement

पिकांमधील अंतर योग्य राखले जाते.

Advertisement

तरी शेतकऱ्यांनी खरीप पिकांची योग्य प्रकारे  आणि योग्य वेळी आंतरपिकांची  कामे केल्यास रोपांची  हेक्टरी संख्या योग्य प्रमाणात राखली जाऊन पिकांसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊन उत्पादनात वाढ होऊ शकते

 

Advertisement

खरीप हंगामातील विविध पिकांमध्ये करावयाची आंतरमशागतीची कामे

Advertisement

सोयाबीन पिकात तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी पेंडेमेथेलीन १ ते १.५ किलो  ६०० ते ७०० लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे.पीक उगवणी नंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.अथवा पीक उगवणी नंतर २१ दिवसांनी प्रति हेक्टरी इमॅजिथॅपर ०.१ ते ०.१५ किलो ५०० ते ६०० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणांवर फवारावे.

Advertisement

तुरीच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरवातीपासूनच तणविरहीत ठेवावे.पीक १५ ते २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी  आणि पुढे १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी.अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३०-४५ दिवस शेत तणविरहीत ठेवावे. मजुराअभावी खुरपणी शक्य नसल्यास पेरणीपूर्वी तणनाशकाचा वापर करावा.त्यासाठी बासालीन किंवा पेंडींमेथिलीन(स्टॉम्प) हे तणनाशक अडीच  ते तीन लिटर प्रती हेक्टरला  ५०० ते ७०० लिटर पाण्यातून वाफशावर फवारून वखरपाळी घालावी म्हणजे  ते जमिनीत मिसळले जाऊन तण नियत्रण अधिक प्रभावी होते.

Advertisement

मुग, उडीदाचे पीक सुरवातीपासूनच तणविरहीत ठेवावे.ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवशक बाब आहे.पीक २०-२५ दिवसांचे असताना पहिली आणि ३०-३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी.कोळपणी शक्यतो वापशावर करावी.कोळपणी नंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी.ही पिके ३० ते ४५ दिवस तणविरहीत ठेवणे हे उत्पादनवाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे.

Advertisement

हुलगा, मटकी, चवळी आणि राजमा ही पिके २० ते २५ दिवांचे असतांना पहिली कोळपणी आणि ३०-३५ दिवसांचे असतांना दुसरी कोळपणी करावी.पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.

Advertisement

कपाशीच्या पिकात मातीची भर, ओलावा टिकवून  ठेवण्यासाठी जमिनीत हवा खेळती  राहून मुळांना आवश्यक असलेला प्राणवायू भरपूर प्रमाणात मिळण्यासाठी व तणनियंत्रणासाठी आंतरमशागत फार महत्वाची आहे.त्याकरिता पेरणी नंतर ३ ते ४ आठवड्यानी ३ ते ४ कोळपण्या, २ ते ३ वेळा निंदणी करून शेत  तणविरहीत ठेवावे.तसेच रासायनिक तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर उगवणीपूर्वी डाययुरॉन हे तणनाशक १ किलोग्राम क्रियाशील घटक किंवा पेंडींमेथिलीन(स्टॉम्प)किंवा बासालीन  ०.७५ ते १ किलोग्राम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी  ५०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर सम प्रमाणात फवारणी करुन वापरावे.  तसेच पेरणीनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी १० ते ३५  दिवसापर्यंत क्यूझॅॉलोफॉपइथिल १.५ लिटर ५५०० लिटर पाण्यातून फवारावे.

Advertisement

बाजरी या पिकात १० दिवसांनी पहिली व २० दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपातील अंतर १५ से. मी. ठेवावे. मक्याची पेरणी संपल्यानंतर त्वरित जमिनीवर अॅट्राटॅाप ५० % हेक्टरी २ ते २.५ किलो फवारावे.आवशक्यतेनुसार खुरपणी करावी.

Advertisement

भुईमुगाच्या पिकात,पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत.१०-१२ दिवसांच्या अंतराने २ ते ३  कोळपण्या कराव्यात व दोन खुरपण्या घ्याव्यात.शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी.त्यामुळे पिकास मातीची भर मिळते.भुईमुगाच्या आरया जमिनीत जाण्यास सुरवात झाल्यानंतर आंतरमशागत करू नये.भुईमूगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर पेंडींमेथिलीन (स्टॉम्प) १ किलोग्राम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी१० लिटर पाण्यातून ओलीवर फवारणी करावी.तसेच पेरणीनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी २०-२५ दिवसांनी परसुट किंवा टरगासुपर १५ मिली व्यापारी उत्पादन /हेक्टरी १० लिटर पाण्यातून दयावे. सूर्यफुल पिकाची पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी एक खुरपणी करावी तसेच दोन कोळपण्या कराव्यात.पहिली कोळपणी पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.

Advertisement

भाजीपाला पिकांमध्ये आवशक्यतेनुसार खुरपणी करून पीक स्वच्छ तणविरहित ठेवावे.फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर  लावावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत.आवशकतेनुसार वर खतांच्या मात्रा द्याव्यात.वेलींना वळण देण्यासाठी ताटी उभारणीसाठी तयारी करावी.

Advertisement

पिकांच्या योग्य वाढीसाठी वेळेवर आंतरमशागत होणे गरजेचे आहे.त्यामुळे खुरपणीचा खर्च  वाचतो.त्याचप्रमाणे आंतरमशागतीची कामे झाल्यावर तूर, कपाशी सारख्या पिकात दर दोन ओळीनंतर सऱ्या काढाव्यात.या सऱ्या मुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मूरविण्या करिता उपयोग होतो.अशा प्रकारे वेळेवर पेरणी केल्यानंतर पिकाच्या निरोगी,जोमदार वाढीसाठी योग्य प्रकारे आंतरमशागतीची कामे केल्यास रोपांची हेक्टरी संख्या योग्य प्रमाणात राखली जाऊन पिकासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊन उत्पादनात निश्चितच वाढ होऊ शकते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply