Take a fresh look at your lifestyle.

तरीही १ लाख ९ हजार सैन्यसंख्या रिक्त..! पहा भरतीबाबत काय माहिती दिलीय सरकारने संसदेत

पुणे : एकीकडे सैन्य भरती मेळाव्यांची संख्या रोडावल्याचे चित्र असतानाच देशातील सैन्यात तब्बल एक लाखाहून अधिक पदसंख्या रिक्त आहे. याबाबत माहिती देताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत म्हटले आहे की, रिक्त पदे भरण्यासह युवकांनी लष्करात यावे यासाठी जनजागृती केली जात आहे.

Advertisement

भारतीय सैन्यदल हे भारतीयांच्या मनात घर केलेले ठिकाण आहे. तरुणांना या सेवेत जाऊन देशसेवा करण्याची इच्छा असते. विशेषतः ग्रामीण भागात अजूनही अनेकजण सैन्य भरतीसाठी पहाटेच सराव करताना दिसतात. त्यांना भरतीची संधी मिळत नसल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. त्याचवेळी सैन्यदलात मोठ्या प्रमाणात सैनिक व अधिकारी यांची पदसंख्या रिक्त आहे.

Advertisement

भट्ट यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात माहिती देताना सांगितले आहे की, तिन्ही सैन्यदलांमध्ये सैनिकांची एक लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. तर, अधिकाऱ्यांचीही नऊ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. युवकांनी लष्करात यावे यासाठी जनजागृती आणि त्यांना प्रेरितही केले जात आहे.

Advertisement
रिक्त पदांचा तपशील असा :
भारतीय लष्कर

Advertisement

अधिकारी : ७,९१२

Advertisement

सैनिक : ९०,६२०

नौदल

Advertisement

अधिकारी : १,१९०

Advertisement

नौसैनिक : ११,९२७

हवाई दल

Advertisement

अधिकारी : ६१०

Advertisement

हवाई सैनिक : ७,१०४

 

Advertisement

Advertisement

Leave a Reply