Take a fresh look at your lifestyle.

म्हणून शेतकरी संघटना आक्रमक; कपाशीच्या नवीन जातीसाठी यंदाही सविनय कायदेभंग..!

औरंगाबाद : राज्यात तणरोधक प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड यंदाही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. १२ हजार शेतकऱ्यांनी संपर्क साधत असे बियाणे नेऊन आपल्या शेतात एचटीबीटीची लागवड केली आहे. शेतकरी संघटनेच्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे राज्यात ३६ % म्हणजे १० लाख हेक्टरवर याची लागवड झाल्याचा दावा शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष व आंदोलनाचे प्रणेते ललित बहाळे यांनी केला आहे.

Advertisement

एचटीबीटी बियाण्याबद्दलचे आक्षेप आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे आरोग्य व जमिनीवर होतो. पेरणीच्या परिसरात कॅन्सर, किडनी आजार होत असल्याचे म्हटले जाते. शेतकरी संघटनेने त्या डाव्यांना शास्त्रीय आधार नसून हे दावे फ़क़्त अफवा असल्याचे म्हटलेले आहे. पर्यावरण संघटनांना त्यांनी थेट अतिरेकी संघटना असेच सर्टिफिकेट देऊन टाकलेले आहे. त्यामुळे यावरील वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

१० वर्षांपासून राज्यात एचटीबीटी लावली जाते. राज्यात ४२.८६ लाख हेक्टरवर कापूस लागवड केली जात असताना मागील वर्षी सुमारे १३ लाख हेक्टरवर एचटीबीटी लागवड झाली होती. त्याबद्दल माहिती देताना चालू वर्षीही मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे बहाळे यांनी म्हटलेले आहे.

Advertisement
बहाळे यांनी म्हटलेय की म्हणून एचटीबीटी बियाण्याला आहे मागणी :
तण उपद्रव कमी केल्याने सरासरी २०% जास्त उत्पन्न मिळते
तणनाशकाची डायरेक्ट फवारणी करू शकत असल्यामुळे खुरपणी व निंदणीची एकरी १२ ते १५ हजार रुपयांची थेट बचत
कापूस पिकांद्वारे पोषक आणि खतांचा कार्यक्षम वापर वाढवण्यात येत असल्याने शेतीचा खर्च कमी
मातीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तणनाशकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत
पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरण्याची सोय करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली मदत

 

Advertisement

Advertisement

Leave a Reply