Take a fresh look at your lifestyle.

हो, अर्थव्यवस्थेचा गाडा रुतलाय…पण ‘तो’ निर्णय घेणार नाही..! केंद्रिय अर्थमंत्र्यांनी काय म्हटलेय पाहा..?

नवी दिल्ली : कोव्हीडमुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीतून जात आहे. कोरोनामुळे दीर्घ काळ लाॅकडाउन करावे लागल्याने कर संकलनात मोठी घट झाली. त्यातून काही प्रमाणात सावरत असतानाच, दुसऱ्या लाटेने अर्थव्यवस्थेचे बारा वाजविले. आता पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. अशा वेळी अर्थव्यवस्थेचा गाडा चालविणे अवघड होणार आहे. माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग यांनीही सरकारला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्थचक्राला चालना देणे, रोजगारनिर्मिती वाढवण्यासाठी सरकारने अतिरिक्त चलन छपाई करण्याचा सल्ला काही अर्थतज्ज्ञांनी दिला होता. विविध स्तरातूनही तशी मागणी होत आहे. मात्र, अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. संसदेत सीतारामन यांनी अतिरिक्त चलन छपाईवर स्पष्ट शब्दांत उत्तर देताना हा मुद्दा निकाली काढला.

Advertisement

सरकारची आर्थिक स्थिती बेताची असल्याने चलनी नोटांची अतिरिक्त छपाई करणार का, असा लेखी प्रश्न संसदेत विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सीतारामन यांनी स्पष्ट शब्दांत असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.

Advertisement

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपी उणे ७.३ टक्के होता. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर भारत योजना जाहीर केली. त्याअंतर्गत विविध क्षेत्रांना २९.८७ लाख कोटी रुपये देण्यात आले. शिवाय २०२१-२२ च्या बजेटमध्येही अनेक उपाययोजना जाहीर केल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

Advertisement

सीतारामन म्हणाल्या, की कोरोना संकटाची तीव्रता पाहता, यंदा आरोग्य क्षेत्रासाठी १३७ टक्के वाढीव निधी जाहीर केला आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सरकारने ६.२९ लाख कोटींचे पॅकेज जाहीर केलेय. रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतलेत. यंदाच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चात ३४.५ टक्के वाढीव तरतूद केली आहे.

Advertisement

आठवड्याची सुरुवात तेजीने..! सोन्यासह चांदीलाही झळाळी, डाॅलरच्या तुलनेत रुपयाही सावरला..
संकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस

Advertisement
Advertisement

Leave a Reply