Take a fresh look at your lifestyle.

आठवड्याची सुरुवात तेजीने..! सोन्यासह चांदीलाही झळाळी, डाॅलरच्या तुलनेत रुपयाही सावरला..

नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याचा सिलसिला नव्या आठवड्यातही कायम असल्याचे पाहायला मिळाले. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच, आज (सोमवारी) सोन्याची किंमत 46 हजार 753 रुपये प्रति तोळ्यावर बंद झाली. चांदीच्या किंमतीतही वाढ नोंदविली गेली.

Advertisement

दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 169 रुपयांनी, तर चांदीच्या भावात 396 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे दिल्लीत सोन्याचा बंद भाव प्रति 10 ग्रॅम 46,753 रुपये होता, तर चांदीचा बंद भाव 66,080 रुपये प्रति किलो झाला होता.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आज प्रति औंस 1807 डॉलरच्या पातळीवर 0.32 टक्क्यांनी वधारले. चांदी 0.83 टक्क्यांनी वधारून 25.44 डॉलर प्रति औंस झाली. डॉलरच्या तुलनेत दोन पैशांच्या मजबुतीसह रुपया 74.42 वर बंद झाला.

Advertisement

अमेरिकेत आर्थिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी झाल्याने गुंतवणूकदार सोनं-चांदीत गुंतवणूक करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जगात सोने-चांदीचे भाव वाढल्याचे ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’चे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. सोन्याच्या दरात वाढ पुढील काही दिवस वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

एमसीएक्सवर (MCX) आज सायंकाळी 4.45 वाजता सप्टेंबरच्या वितरणासाठीचे सोन्याचे भाव 141 रुपयांनी वाढून 47663 रुपये प्रति दहा ग्रॅमवर, तर ऑक्टोबर सोन्याचे दर 123 रुपयांनी वाढून 47907 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. सप्टेंबरच्या डिलीव्हरीसाठी चांदीची किंमत 453 रुपयांनी घसरून 67477 रुपये प्रतिकिलोवर होती आणि डिसेंबरमध्ये डिलीव्हरीसाठी चांदी 406 रुपयांनी वाढून 68581 रुपये प्रतिकिलोवर होती.

Advertisement

कोरोनाचा डेल्टा प्रकार आणि जागतिक महागाईतील वाढ, यामुळे सोन्याच्या किंमती वाढत्या असतील. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या 48500 च्या पातळीवर अडथळा असल्याचे सुगंध सचदेव यांनी सांगितले. जर ही पातळी खंडित झाली तर दिवाळीपर्यंत ते 52500 च्या पातळीवर पोहोचेल.

Advertisement

आयआयएफएल सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिडेंट अनुज गुप्ता म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव 1750 डॉलर्सपेक्षा जास्त राहील, तोपर्यंत त्याची किंमत वाढण्याची अपेक्षा आहे. 46500-46200 पातळीवर एमसीएक्सला खूप मजबूत समर्थन आहे. अशा परिस्थितीत जोपर्यंत तो देशांतर्गत बाजारामध्ये राहतो, तोपर्यंत गुंतवणूकदारांना राहण्याचा सल्ला दिला जाईल.

Advertisement

भारतात सोन्याची आयात वाढली, चांदीची मात्र घसरली, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालाय असा परिणाम..!
मायक्रोग्रीन शेतीतून घरबसल्या कमवा लाखो रुपये..! कशी करणार, मग ही बातमी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply