Take a fresh look at your lifestyle.

मायक्रोग्रीन शेतीतून घरबसल्या कमवा लाखो रुपये..! कशी करणार, मग ही बातमी वाचा..

नवी दिल्ली : कोरोनामुळे नोकरी गेली. शिवाय अजूनही बाहेर जाण्याची भीती वाटते. अशा वेळी तुम्ही स्वत:चा बिझनेस सुरु करुन घरबसल्या दररोज पैसे कमावू शकता. कोरोनामुळे लोक आता स्वत:च्या आरोग्यावर अधिक लक्ष देत आहेत. त्यामुळेच ‘मायक्रोग्रीन’ या सुपर फूडची (Micro green) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Advertisement

फळे आणि भाज्यांच्या तुलनेत मायक्रोग्रीनमध्ये ४० पट अधिक पोषक तत्त्वे असतात. त्यामुळेच त्याला सुपरफूड म्हटलं जातं. मार्केटमध्ये मागणी वाढल्यामुळे अनेक लोकांनी हा व्यवसाय सुरु केला असून, त्याद्वारे दरमहा लाखो रुपये कमावत आहेत. चला तर मग आपण आज या व्यवसायाबाबत जाणून घेऊ या.

Advertisement

मायक्रोग्रीन म्हणजे काय?

Advertisement

कोणत्याही झाडाला सुरुवातीला येणाऱ्या कोवळ्या पानांना ‘मायक्रोग्रीन’ म्हणतात. ही पाने दोन ते तीन इंच लांब असतात. ही पानं कोवळी असतानाच ती तोडून बाजूला केली जातात. या कोवळ्या पानांपासून एवढं पोषण मिळतं, की दररोज केवळ ५० ग्रॅम मायक्रोग्रीन्स सेवन केले, तरी पोषणाच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात. यासाठी मुळा, मोहरी, मूग या झाडांच्या कोवळ्या पानांचा वापर केला जातो.

Advertisement

मायक्रोग्रीन शेती कशी कराल?

Advertisement

मायक्रोग्रीन शेतीची सर्वांत मोठी खासियत म्हणजे, त्यासाठी तुमच्याकडे शेतजमीन असलीच पाहिजे, असे काही नाही. अगदी घराच्या टेरेसवर, बाल्कनीत किंवा चक्क बेडरूममध्येही तुम्ही ही शेती करू शकाल. यासाठी तुम्हाला ट्रे, बियाणं, जैविक खत आणि माती किंवा कोकोपीटची गरज भासते.

Advertisement

झाडांना सूर्यप्रकाशाची गरज असल्यामुळे आपण ती उन्हात ठेवतो; मात्र मायक्रोग्रीन शेतीसाठी झाडांना प्रखर सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. दररोज काही प्रमाणात पाणी शिंपडल्यानंतर काही दिवसांमध्येच रोपं उगवण्यास सुरुवात होते. यासाठी मुळा, गाजर अशी कंदमुळं किंवा इतर भाज्यांचाही वापर करता येतो.

Advertisement

मायक्रोग्रीन शेतीसाठी तुम्हाला जास्त प्रमाणात खर्च करण्याची गरज नाही; मात्र यातून चांगल्या प्रमाणात पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला ते योग्य प्रकारे विकता यायला हवं. दोन-तीन आठवड्यांमध्येच हे मायक्रोग्रीन पीक काढणीसाठी तयार होतं. यानंतर तुम्हाला 5 स्टार हॉटेल, कॅफे आणि सुपर मार्केट्समध्ये हे विकता येते.

Advertisement

पॅकिंगमध्ये न विकता, केवळ हॉटेल आणि कॅफेंनाही तुम्ही याचा पुरवठा करू शकता. किंवा मग तुम्हाला शक्य असेल, तर स्वतःचं दुकान आणि ब्रँड सुरू करूनही तुम्ही याचा व्यवसाय करू शकता. अगदी कमी जागेत, कमी भांडवलावर हा व्यवसाय करून चांगले इनकम मिळवता येणार आहे.

Advertisement

आय्योव.. म्हणून त्या आईसक्रिमला आहे सोन्याची किंमत; ६० हजारांना मिळतोय एकच कप..!
पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply