Take a fresh look at your lifestyle.

‘कमळ’यानासाठी विदर्भा भाजपचे सीमोल्लंघन; मात्र, आरोपात नाव पुढे आल्यावर बावनकुळे म्हणतात असे

नागपूर : झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) व काँग्रेस या दोन पक्षाच्या आघाडी सरकारला खेचून सत्तासोपान चढण्याचा डाव भाजपने रचल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी भाजपने थेट आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या खरेदीच्या खेळात विदर्भातील भाजपच्या नेत्यांचे नाव पुढे आलेले आहे.

Advertisement

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर आणि जयकुमार बेलखेडे या भाजप नेत्यांची नावे या प्रकरणातील आरोपी अभिषेक दुबे याने दिलेल्या कबुलीजबाबात घेतले आहेत. एकूणच यामुळे सत्तासोपान चढण्यासाठी सगळीकडे केंद्रातील सत्ताधीश भाजपा कसे डाव खेळतो याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने संधी न दिलेले बावनकुळे यामुळे पुन्हा एकदा बातमीचा मुद्दा बनले आहेत.

Advertisement

तीन आमदारांसह दि. १५ जुलै रोजी दिल्लीला गेल्यावर महाराष्ट्रातील भाजपच्या दोन नेत्यांशी आमदारांचा व्यवहार ठरला. त्यासाठी एक कोटी रुपये अॅडव्हान्स मिळणार देण्याचे ठरले. मात्र, अॅडव्हान्स न मिळाल्याने आमदार पुन्हा रांचीला परतले. व्दारका येथील विवांता या पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. सर्वांची तिकिटे महाराष्ट्रातील व्यावसायिक जयकुमार बेलखेडे यांनीच काढली होती. दिल्लीत त्यानंतर बावनकुळे, चरणसिंग यांच्यासह काही नेत्यांच्या घरी गेलो, असा दावा आरोपी अभिषेक दुबे याने केला आहे.

Advertisement

दरम्यान, बावनकुळे यांनी ‘दिव्य मराठी’ला म्हटले आहे की, १९ जुलैपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेलो आहे. माझे नाव या प्रकरणात कसे आले हे माहिती नाही. असे सांगतानाच १५ -१६ जुलै रोजी आपण कुठे होता, असे विचारले असता त्यांनी एेकू येत नसल्याचे सांगून फोन कट केला असे बातमीत म्हटलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply