Take a fresh look at your lifestyle.

भारतात सोन्याची आयात वाढली, चांदीची मात्र घसरली, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालाय असा परिणाम..!

मुंबई : जगात चीननंतर भारत हा सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारतात दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात होते. प्रामुख्याने दागिने बनविण्यासाठीच भारतात सोन्याचा वापर केला जातो.

Advertisement

सोन्याच्या आयातीत चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून वाढ सुरु झाली होती. हा शिरस्ता अद्यापही कायम आहे. देशातील सोन्याच्या आयातीत एप्रिल-जून तिमाहीत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे चालू खात्यातील तूट आणखी वाढली असून, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे फारसे चांगले लक्षण नाही.

Advertisement

एप्रिल-जून तिमाहीत सोन्याची आयात 7.9 अब्ज डॉलर्सनी वाढून 58,572.99 कोटी रुपयांवर पोहोचली. यापूर्वी एप्रिल- मे महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिक पट सोन्याची आयात नोंदविली होती. दुसरीकडे यंदा चांदीची झळाळी कमी होताना दिसतेय. एप्रिल-जून तिमाहीत चांदीची आयात 93.7 टक्क्यांनी घसरून 3.91 कोटी डॉलर्स इतकी राहिली.

Advertisement

दरम्यान, भारतीय बाजारपेठेत सध्या सोने 47 हजारांच्या आसपास आहे. शनिवारी (ता.२४) बाजार बंद झाला, तेव्हा सोने 47526 रुपये प्रतितोळा होते. आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच सोन्यात गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचे बोलले जाते.

Advertisement

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मंदी आलेली असताना, परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाली आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम दिसत आहे. 18 जूनला परकीय चलन गंगाजळी 4.148 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन 603.933 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आलीय.

Advertisement

युरो, पाऊंड आणि येन या परकीय चलनांच्या विनिमय दरात मोठे चढउतार होत आहेत. यापूर्वी 4 जून रोजी Forex Reserves वाढ पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळातही परकीय गुंतवणुकदारांनी भारतावर विश्वास ठेवला. त्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर गेली होती.

Advertisement

मायक्रोग्रीन शेतीतून घरबसल्या कमवा लाखो रुपये..! कशी करणार, मग ही बातमी वाचा..
एका झटक्यात 18 जण अब्जाधीश..! झोमॅटोच्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply