Take a fresh look at your lifestyle.

वाढत्या इंधनदरामुळे ‘डाॅमिनोज’चा मोठा निर्णय, ग्राहकांना आता ‘असा’ मिळणार त्यांच्या आवडीचा पिज्जा..!

मुंबई : मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढला आहे. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी अनुदान दिले जाते. त्यामुळे अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक बाईक्स वापरण्याचा विचार करत आहेत. यासाठी आगामी काळात देशभरात चार्जिंग स्टेशन्सची संख्याही वाढवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील आघाडीच्या डॉमिनोज पिझ्झा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.

Advertisement

आता डॉमिनोजच्या डिलिव्हरी बॉईजना पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या दुचाकींऐवजी इलेक्ट्रिक बाईक्स देण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘डॉमिनोज’ने ‘रिवोल्ट मोटर्स’ कंपनीशी हातमिळवणी केली आहे. ‘डॉमिोनज’ने या कंपनीच्या 300 ई-बाईक्स खरेदी केल्या आहेत. लवकरच या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या बाईक्सची जागा घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

इलेक्ट्रिक बाईक्समुळे प्रदूषण, इंधनावरील खर्च कमी होईल, असे ‘रिवोल्ट मोटर्स’च्या व्यापार प्रमुख अंजली रत्तन यांनी सांगितले. साधारण बाईक्सच्या तुलनेत ई-बाईक्सचा उत्पादनखर्च कमी आहे. त्यामुळे बाजारपेठेत जास्तीत जास्त ई-बाईक्स आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. शिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सरकारकडून अनुदानही दिले जाते. त्यामुळे खर्चात बचत होते. त्यामुळे डॉमिनोजसारख्या कंपन्या या धोरणाचा लाभ उठवू पाहत आहेत. जेणेकरून इंधनावरील पैशात बचत होईल.

Advertisement

देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे, तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल. येत्या आठ ते दहा दिवसांत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यानंतर देशभरात वाहननिर्मिती उद्योगासाठी फ्लेक्स-फ्यूएल इंजिन अनिवार्य होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते.

Advertisement

सध्या ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्यूएल इंजिनची निर्मिती होते. त्यामुळे वाहनचालकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

Advertisement

केंद्र सरकारने येत्या दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. जेणेकरून भारताला खनिज तेलाची आयात कमी प्रमाणात करावी लागेल. 2015 मध्ये पेट्रोलमध्ये एक ते दीड टक्के इथेनॉलची मात्रा होती. सध्या हे प्रमाण 8.5 टक्के इतके आहे. पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणामुळे इंधनाची गुणवत्ता सुधारते. तसेच उत्पादनासाठी कमी खर्च लागत असून प्रदूषणही कमी होते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

Advertisement

भारतात सोन्याची आयात वाढली, चांदीची मात्र घसरली, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालाय असा परिणाम..!
मायक्रोग्रीन शेतीतून घरबसल्या कमवा लाखो रुपये..! कशी करणार, मग ही बातमी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply