Take a fresh look at your lifestyle.

दोनच वर्षांनी भाजपच्या येडियुरप्पाना झटका; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी राजीनाम्यानंतर

बेंगळूरू : कर्नाटक राज्यात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सत्ताधारी आघाडीला झटका देताना येडीयुरप्पा यांनी सत्तास्पर्धेत बाजी मारली होती. मात्र, ज्या तारखेला ते सत्तासोपान चढले होते, त्याच तारखेला म्हणजे आजच दोन वर्षांनी त्यांना राजीनामा देऊन पायउतार व्हावे लागले आहे. त्यांनी यामुळे अजिबात वाईट वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी सोमवारी राजीनाम्याची घोषणा केल्यावर राजकीय घडामोडींना आणखी वेग आलेला आहे. दुपारच्या जेवणानंतर राज्यपालाची भेट घेणार असून त्यांना आपला राजीनामा सादर करण्याच्या घोषणेसमवेत त्यांनी वेळोवेळी नेहमीच कठीण संकटातून गेलो असल्याची आठवण काढली आहे.

Advertisement

दरम्यान, बी एस येडियुरप्पा यांच्यासह मोठ्या प्रमाणात लिंगायत समुदाय आहे. लिंगायत समाजातील विविध मठातील 100 पेक्षा जास्त संतानी येडियुरप्पा यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला असल्याने आता हा समाज कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 17 टक्के आणि 224 विधानसभा आमदारकीच्या जागांपैकी 90 ते 100 जांगावर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे.

Advertisement

येडियुरप्पा यांनी 16 जुलैला दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यावर येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याविषयीच्या चर्चांना उधाण आलेले होते. आज त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply