Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचे महिला शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, नुसता योजनांचा बोलबाला.. 23 राज्यांना दमडीचीही मदत नाही..!

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील महिला शेतकर्‍यांचा सहभाग वाढावा, यासाठी केंद्र सरकारने महिला सशक्तीकरण योजना आणली. मात्र, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर महिलांच्या प्रगतीबाबत सरकार अजूनही उदासीन दिसते.

Advertisement

संपूर्ण जगभर कृषी क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणून महिलांकडं पाहिलं जात असलं, तरी महिला शेतकर्‍यांसाठी काम करणारी देशातील एकमेव संस्था ‘सीआयडब्ल्यूए’मध्ये संचालक बनविण्यासाठी सरकारला एकही महिला वैज्ञानिक उपलब्ध झाली नसल्याचं समोर आलंय. दुसरीकडे महिला शेतकरी सशक्तीकरण (एमकेएसपी) प्रकल्पाच्या खर्चात 6 पट घट करण्यात आली आहे.

Advertisement

महिला शेतकरी सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत 2020-21 दरम्यान 23 राज्यांना अद्याप एक रुपयाही पाठविलेला नाही. 2011 मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाने ही योजना सुरू केली होती. गेल्या दोन वर्षांत त्याअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या रकमेत सहा पट घट झाली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर महिला शेतकरी प्रगती कशी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement

महिला शेतकरी सक्षमीकरण योजनेंतर्गत, मागील वर्षी (2020-21) केवळ 11.20 कोटी रुपयांचे राज्यांना वाटप करण्यात आले, 2018-19 मध्ये ही रक्कम 65.60 कोटी होती. मागील वर्षी केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशला 4.12 कोटी, झारखंडला 3.49 कोटी, नागालँडला 2.35 कोटी, उत्तराखंडला 0.67 आणि पुद्दुचेरीला 0.57 कोटी रुपये दिले, तर 23 राज्यांना दमडीही मिळाली नाही.

Advertisement

महिला शेतकरी सशक्तीकरण प्रकल्प हा मागणी आधारित कार्यक्रम आहे. दरवर्षी राज्यनिहाय वाटपाची तरतूद नाही. काही योजनांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना जास्त मदत केल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे म्हणणे आहे.

Advertisement

भुवनेश्वरच्या केंद्रीय महिला महिला कृषी संस्थेचे संचालक म्हणूनही पुरुषच काम पाहतो. अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) मते भारतीय कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान सुमारे 32 टक्के आहे. ईशान्य आणि केरळमध्ये शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे योगदान पुरुषांच्या तुलनेत खूप जास्त आहे. सुमारे 7.5 कोटी महिला दुग्ध उत्पादन आणि पशुधन व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. 48 टक्के महिला शेतीमध्ये गुंतलेल्या आहेत.

Advertisement

आयकर पोर्टल ऑगस्टपासून सेवेत..! मोदी सरकारची ग्वाही, करदात्यांना कसा फायदा होणार, जाणून घेण्यासाठी वाचा..!
आय्योव.. म्हणून त्या आईसक्रिमला आहे सोन्याची किंमत; ६० हजारांना मिळतोय एकच कप..!

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply