Take a fresh look at your lifestyle.

एका झटक्यात 18 जण अब्जाधीश..! ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..!

नवी दिल्ली : ‘झोमॅटो’ने नियोजित वेळेआधीच भांडवली बाजारात प्रवेश केला. शुक्रवारी (ता.23) सकाळी झोमॅटोच्या शेअरची नोंदणी झाली. पाहता पाहता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला नि कंपनीचा शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत ५० टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला.

Advertisement

कंपनीचे वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह एका झटक्यात 18 जण त्यात अब्जाधीश झाले. कालच्या जोरदार लिस्टिंगमुळे 18 जणांची मालमत्ता १० लाख डॉलर्सवर गेली. त्यात ‘झोमॅटो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक दीपेंद्र गोयल यांची संपत्ती ४६५० कोटींपर्यंत वाढली. दीपेंद्र यांची ‘झोमॅटो’मध्ये 5.5 टक्के हिस्सेदारी आहे.

Advertisement

‘झोमॅटो’चे दुसरे सहसंस्थापक गुंजन पाटीदार यांनाही प्रचंड फायदा झाला. पाटीदार यांच्याकडील शेअर आणि ‘ई-साॅप’चे एकूण मूल्य ३६३ कोटी इतके वाढले. शिवाय कंपनीचे बिझनेस हेड मोहित गुप्ता यांची मालमत्ता १९५ कोटी इतकी वाढली.

Advertisement

‘झोमॅटो’चे पुरवठा विभागप्रमुख गौरव गुप्ता यांच्या शेअरचे एकूण मूल्य १७९ कोटींनी वाढले. तसेच आणखी एक संस्थापिका आकृती चोप्रा यांच्याकडील शेअरचे एकूण मूल्य १४९ कोटी इतके वाढले. झोमॅटोचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर अक्षांत गोयल यांच्या शेअरचे मूल्य ११४ कोटी इतके झाले.

Advertisement

झोमॅटोमध्ये हिस्सेदारी असलेले प्रवर्तक आणि वरिष्ठ अधिकारी कोट्यधीश बनले आहे. २०१९ मध्ये झोमॅटोने फिड इंडिया या एनजीओचे अधिग्रहण केले होते. या फिड इंडियाच्या संस्थापक अंकित क्वात्रा यांच्याकडील शेअरचे मूल्य १०५ कोटी झाले आहे.

Advertisement

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) झोमॅटो ५१.३२ टक्के वाढीव दराने ११५ रुपयावर सूचिबद्ध झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर तो ५२.६३ टक्के वाढीव किमतीत ११६ रुपयांवर खुला झाला. या इश्यूसाठी कंपनीने प्रती शेअर ७२ ते ७६ रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता.

Advertisement

क्रिप्टोकरन्सी जोरात..! गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा.
संकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस

Advertisement
Advertisement

Leave a Reply