Take a fresh look at your lifestyle.

जगभरात करोनाथैमान; पहा कशी परिस्थिती ओढवलीय अमेरिकेवर

दिल्ली : सध्या भारतात तिसऱ्या लाटेबद्दल तर्क-वितर्क लढवले जात आहेत. काहींना अशी लाट येणार नाही असे वाटते. तर, काहीजण अशी लाट कधीही येऊ शकते आणि मोठे संकट निर्माण करू शकते असे वाटत आहे. अशावेळी जगभरात अनेक देशात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब काळजी वाढवणारी आहे.

Advertisement

या काळात कोरोना पुन्हा का फैलावत आहे याची काही कारणे स्वामीनाथन यांनी सांगितली होती. पहिले कारण म्हणजे डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत आहे, नेमक्या याच काळात लॉकडाऊनचे निर्बंध कमी केले जात आहेत आणि लसीकरणाचा वेग सुद्धा कमी झाला आहे. डेल्टा व्हेरिएंट हा आतापर्यंत सापडलेल्या सर्व व्हेरिएंट पेक्षा जास्त घातक ठरला आहे, आणि रुग्ण वाढीस हाच व्हेरिएंट कारणीभूत ठरला आहे.

Advertisement

या काळात आता लोक घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे पुन्हा गर्दी होत आहे. या कारणामुळे सुद्धा रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. जगात काही ठिकाणी लसीकरणामुळे कोरोनाचा धोका कमी होत असून रुग्ण दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर दुसरीकडे असेही काही देश आहेत जिथे ऑक्सिजनची कमतरता, दवाखान्यात बेड नाहीत आणि मृत्यूदर सुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे निदान आता तरी असे म्हणता येणार नाही की कोरोना आटोक्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement

जगभरात सध्या कोरोना नव्या रुपात थैमान घालत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगातील अनेक देशांना हैराण केले आहे. या व्हेरिएंटमुळे रुग्ण पुन्हा वेगाने वाढू लागले आहेत. जगभरात मागील 24 तासात तब्बल 5 लाख 68 हजार नवे कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत. ब्रिटेन आणि अमेरिकेत कोरोना वेगाने फैलावत चालला आहे. अमेरिकेत मागील 24 तासात 61 हजार 651 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. इंडोनेशिया, म्यानमार या देशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्स, रशिया, जर्मनी, इटली, दक्षिण कोरिया या देशातही रुग्ण पुन्हा वाढत चालले आहेत. रशियामध्ये कोरोनाा गामा व्हेरिएंट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी इशारा दिला होता, की कोरोना इतक्यात जाणार नाही. तसेच आज जगात कोरोना पुन्हा का वाढत आहे याची कारणे सुद्धा सांगितली होती. आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले होते, की डेल्टा व्हेरिएंट आणि लसीकरण मोहिमेचा वेग कमी झाल्याने जगातील बहुतांश ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता असे म्हणता येणार नाही की महामारी कमी होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

आरोग्यदायी माहिती वाचा आणि निरोगी राहा; पहा महत्वाचे मुद्दे

Advertisement

एकदमच वाईट चाललंय की.. बनावट लसीकरण जोमात, अवघी आरोग्य यंत्रणाच कोमात..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply