Take a fresh look at your lifestyle.

मुजोर चीनला WHO चाही झटका; पहा नेमके काय म्हटलेय संस्थेने अवघ्या जगाला

दिल्ली : कोरोना विषाणूच्या तपासाकामी चीनने सहकार्य केले नाही तर त्यास जगात एकटे पाडले जाईल, असा इशारा अमेरिकेने आधीच दिला आहे. ऑस्ट्रेलिया तसेच युरोपातील अनेक देश चीनच्या विरोधात आहेत. त्यामुळे या प्रकरणी चीनवर दबाव वाढत चालला आहे. आता आरोग्य संघटनेने सगळ्याच देशांना आवाहन केले आहे. आरोग्य संघटनेच्या आवाहनास अद्याप कोणत्या देशाने प्रतिसाद दिल्याची माहिती नाही. तसेच चीनने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, चीन प्रतिक्रिया देणार नाही असे होणार नाही. त्यामुळे या प्रकरणी आता चीन काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

कोरोना विषाणूच्या उगमाच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनची चांगलीच कोंडी केली आहे. कोरोना वायरस वुहान प्रयोगशाळेतूनच लीक झाल्याचा दावा केला जात आहे. काही शास्त्रज्ञांना तसे पुरावे सुद्धा मिळाले असल्याचे सांगितले आहे. जगभरातील विविध संस्थांचे जे अहवाल येत आहेत, त्यातही हा विषाणू प्रयोगशाळेतूनच पसरल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे, तसे आरोपही चीनवर सातत्याने होत आहेत. त्यामुळे या प्रकरणी आणखी चौकशी करण्याची मागणी जगभरातून होत असताना मुजोर चीन पुन्हा तपासणी करण्यास आजिबात तयार नाही. तसेच चीनने आता प्रयोगशाळेत आधिक सावधानता तसेच देशातील मार्केटचे निरीक्षण करण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे आता कोरोना विषाणूचा ठावठिकाणा मिळणे आधिकच कठीण झाले आहे. कोरोना विषाणूचा ठावठिकाणा शोधून काढण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्व देशांना केले आहे.

Advertisement

कोरोना विषाणू बाधित पहिला रुग्ण चीनच्या वुहान प्रांतात आढळला होता. डिसेंबर 2019 मध्ये हा रुग्ण सापडला होता. मात्र, चीन वुहान प्रयोगशाळेतून विषाणू लीक झाल्याचा आरोप सातत्याने नाकारत आहे. या विषाणूच्या उगम शोधून काढण्यासाठी पुन्हा तपासणी करण्याचा मुद्दा चीनची पाठराखण करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनेच उपस्थित केला होता. मात्र, चीनचे उपमंत्री झेंग वाइजिंगने हा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यानंतर आता आरोग्य संघटनेने जगातील अन्य देशांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. तसेही अमेरिकेने या दिशेने तपास आधीच सुरू केला आहे. तसेच जागतिक मंचावर प्रत्येक ठिकाणी अमेरिका या मुद्द्यावर चीनला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, चीनने या प्रकारांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. आता मात्र जागतिक आरोग्य संघटना सुद्धा चीनच्या विरोधात आहे. त्यामुळे चीनच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत.

Advertisement

Advertisement

Leave a Reply