Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..?

नवी दिल्ली : भारताला लागणारे 80 टक्के कच्चे तेल हे परदेशातून आयात केले जाते. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगणाला भिडले असून, सर्वसामान्य नागरिकांची रोज ओरड सुरु आहे. अशा काळात मोदी सरकार महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचे समजते.

Advertisement

मोदी सरकार पेट्रोलियमचा राखीव साठ्यातील (स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (SPR) काही हिस्सा रि-एक्स्पोर्ट करणार आहे. या सगळ्याचे सूत्रे खासगी कंपनीच्या हातात दिली जाऊ शकतात. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून जुलैअखेर SPR चा अर्धा हिस्सा खासगी कंपन्यांकडे दिला जाऊ शकतो.

Advertisement

सध्याच्या घडीला भारत हा कच्च्या तेलाचा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. यापूर्वी केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिकेतील तीन ठिकाणी स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह तयार केले आहेत. त्याठिकाणी 50 लाख टन तेल साठवले जाऊ शकते.

Advertisement

आपात्कालीन किंवा मागणी वाढल्यावर कच्च्या तेलाची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ वापरले जाते. सध्या मोदी सरकार ओडिशातील चंडीखोल आणि कर्नाटकातील पादूर येथे SPR तयार करण्याच्या विचारात आहे. याठिकाणी देशाला 12 दिवस पुरेल, इतक्या तेलाचा साठा होऊ शकतो.

Advertisement

त्यातील अर्धा तेलसाठा हा खासगी कंपन्यांना लीजवर दिला जाऊ शकतो. खासगी कंपन्यांकडून लीजवर घेतलेला तेलाचा साठा भारतीय कंपन्यांना विकला जाईल, किंवा हे तेल पुन्हा निर्यात केले जाईल. केंद्र सरकार देशात आणखी काही स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह उभारण्याच्या विचारात आहे. मात्र, त्यासाठी खासगी भागीदारांच्या सहभागासाठी केंद्र सरकार आग्रही असल्याचे समजते.

Advertisement

आय्योव.. म्हणून त्या आईसक्रिमला आहे सोन्याची किंमत; ६० हजारांना मिळतोय एकच कप..!
म्हणून अखेर गुगलला बंद करावे लागतेय ‘तेही’ उत्पादन; पहा कोणाला होणार याचा तोटा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply