Take a fresh look at your lifestyle.

नोकरी इच्छुकांसाठी महत्वाची बातमी; पहा कुठे होत आहे ऑनलाईन जॉब फेअर

नाशिक : येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे  २६ ते ३० जुलैदरम्यान ऑनलाइन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अायोजन करण्यात आले आहे. यामधील मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स, मोबाइल, दूरध्वनीद्वारे घेण्यात येणार असून नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.

Advertisement

कार्यालयाच्या अधिकृत NashikSkill या Facebook page वरून याची माहिती आणि इतर मार्गदर्शन केले जात आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, पदवीधर अादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगार संधी या मेळाव्यात उपलब्ध आहेत. नाेकरी इच्छूक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास त्यांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

Advertisement

तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करून जॉब फेअर टॅबवर क्लिक करून NASHIK ONLINE JOB FAIR-4 (2021-22) यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्त पदांसाठी अप्लाय करावे. कार्यालयीन वेळेत दुरध्वनीक्रमांक ०२५३-२९७२१२१ वर संपर्क साधून या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन सहायक अायुक्त अ. ला. तडवी यांनी केले अाहे.

Advertisement
पुढील कंपनीत रिक्त पदांची भरती केली जाईल
महिंद्रा इपीसी इेरिगेशन (नाशिक) पद : ट्रेनी ५०
व्हीआयपी इंड्रस्ट्रीज (नशिक) पद : एनएपीएस ट्रेनी १५०
सोपान हॉस्पिटल (नाशिक) पद : आरएमओ ४
स्नेह एंटरप्रायझेस (नाशिक) पद : हाउसकिपर २०
महावीर व्हिल्स (नाशिक) पद : सेल्स १०,

Advertisement

पद : मॅकेनिक १०, पद : सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह १०

 

Advertisement

करोना झटक्यातही आलीय ‘ही’ गुड न्यूज; पहा अॅग्रो व फूड सेक्टरसह कशामध्ये दिसलाय परिणाम

Advertisement

अंबानींच्या रिलायंसलाही बसलाय ‘असा’ झटका; पहा कशाचा परिणाम झालाय ते

Advertisement
Advertisement

Leave a Reply