Take a fresh look at your lifestyle.

अंबानींच्या रिलायंसलाही बसलाय ‘असा’ झटका; पहा कशाचा परिणाम झालाय ते

मुंबई : करोना संकटापुढे महाराष्ट्र आणि भारत देश हतबल झाल्याचे आपण दुसऱ्या लाटेत पाहिले. त्यावेळी ऑक्सिजन आणि औषधे न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. हीच आकडेवारी लपवण्याचे प्रयत्न सरकारी यंत्रणा करीत आहे. त्याचवेळी उद्योग जगतालाही मोठा झटका बसाल होता. कारण, त्या झटक्याच्या यादीत चक्क भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सचाही समावेश आहे.

Advertisement

कोरोना संकटाचा देशातील खासगी क्षेत्रालासुद्धा मोठा फटका बसला आहे. याबाबत अनेकदा बातम्या आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजलासुद्धा या संकटाचा फटका बसला आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या या ग्रुपला झटका बसतो म्हटल्यावर या झटक्याची तीव्रता किती मोठी असेच याची व्याप्ती सहजपणे लक्षात येण्यासारखी परिस्थिती आहे.

Advertisement

जून तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफा घटल्याचे दिसून आले आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा जवळपास 7 टक्क्यांनी घटला असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीच्या रिटेल व्यापारास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका बसला आहे. एप्रिल जून मध्ये कंपनीचा नफा 12 हजार 273 कोटी रुपये राहिला आहे. याआधीच्या आर्थिक वर्षात एप्रिल-जून या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 13 हजार 233 कोटी रुपये होता. म्हणजेच यावेळी कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply