Take a fresh look at your lifestyle.

संकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस

मुंबई : जगात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. अशा परिस्थितीत बहुतेक देश युद्धपातळीवर लसीकरण करण्यात गुंतलेले आहेत. सध्या, 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस डोस देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत अद्यापही मुलांवर व्हायरसचा धोका कमी झाला नाही. अशावेळी आता एक चांगली बातमी समोर आली आहे.

Advertisement

युरोपियन युनियनच्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थेने 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस मंजूर केली आहे. मेच्या सुरुवातीस, युरोपियन मेडिसीन एजन्सीने (ईएमए) या वयोगटातील फायझरला मान्यता दिली होती. ईएमएने म्हटले आहे की 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्पाइकॅक्स लस 18 आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील मुलांसाठी वापरली जाईल. लसचे दोन डोस दिले जातील. त्यांच्यामध्ये फक्त 4 आठवड्यांचे अंतर ठेवले जाईल.

Advertisement

ईएमएनुसार, स्पाइकवॅक्सची 12-17 वर्षे वयोगटातील 3,732 मुलांवर चाचणी घेण्यात आली. त्याचे निकाल सकारात्मक होते. या दरम्यान प्रत्येकाच्या शरीरात अँन्टीबॉडीजची चांगली मात्रा तयार झाल्याचे आढळले. 18 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांमध्येही अँन्टीबॉडीज अशी दिसली.

Advertisement

त्याच वेळी फायझरने 12 वर्षाखालील मुलांवर देखील त्याच्या लसीची चाचणी सुरू केली आहे. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात लहान मुलांना अल्प प्रमाणात लस वेगवेगळ्या प्रमाणात दिली जाईल. यासाठी फिझरने जगातील चार देशांतील साडेचार हजाराहून अधिक मुलांना निवडले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply