Take a fresh look at your lifestyle.

शासनाचा कर्मचाऱ्यांना झटका; पहा काय आचारसंहिता लागू झालीय सरकारी नोकरदारांना

मुंबई : सरकारी कर्मचारी म्हणजे देशाचे जावई असल्याच्या थाटात कामचुकारपणा करताना पाहण्याची सवय भारतीयांना जडली आहे. त्यामुळेच त्यांच्या कामचुकारपणा किंवा लाचखोरीच्या प्रकरणावर कारवाईहोत नाही. मात्र, सामान्य माणसांना एका चुकीची मोठी शिक्षा भोगावी लागते. त्यातच आता अशा कर्मचाऱ्यांनाही आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.

Advertisement

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परिधान करावयाच्या वेशभूषेबाबत मध्यंतरी निर्णय काढल्यावर गदारोळ करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी आता भ्रमणध्वनी (मोबाइल) वापराबाबत आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी केला आहे. आता त्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

शासनाचे सुमारे १ लाख २० हजार कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी आता भ्रमणध्वनी (मोबाइल) आचारसंहिता लागू  झालेली आहे. त्यातील मुद्दे असे :

Advertisement
कार्यालयात शक्यतो लँडलाइनचा वापर
गरज भासली तरच मोबाइलचा वापर
मोबाइलवर सौजन्यपूर्वक बोलावे, वाद टाळावे
लघुसंदेशचा (टेक्स्ट मेसेज) वापर करावा
लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ यांच्या आलेल्या दूरध्वनींना त्वरित उत्तरे द्यावीत
समाज माध्यमांचा वापर करत असताना वेळ आणि भाषा याचा तारतम्याने वापर करावा
वैयक्तिक काॅल असतील तेव्हा कार्यालयाच्या बाहेर जाऊन घ्यावे
कार्यालयीन कामांसाठी कर्मचारी दौऱ्यावर असेल तर मात्र मोबाइल बंद ठेवता येणार नाही
वरिष्ठांच्या कक्षात मोबाइल सायलेंट मोडवर ठेवावेत
बैठकीत किवा वरिष्ठांच्या कक्षात मेसेज पाहणे टाळा

 

Advertisement

पाकिस्तान-चीनलाही बसणार ‘चेकमेट’; पहा रशियाने काय ऑफर दिलीय भारताला..!

Advertisement

BLOG : पहा ‘पेगासस’च्या मुद्द्यावर रविशकुमार यांनी नेमके काय म्हटलेय; खूपच गंभीर आहे प्रकरण

Advertisement
Advertisement

Leave a Reply