Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आर्थिक घडामोडींवर मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलीय ‘ही; चिंता..!

मुंबई : देशभरात सध्या मोठे आर्थिक संकट आहे. बडे उद्योजक, मेडिकल जगतामधील काहीजण आणि केंद्र सरकार वगळता अनेकांकडे पैशांची वाणवा आहे. ही परिस्थिती कधी आणि कशी सुधारेल याचेच मोठे आव्हान आहे. त्यावर केंद्र सरकारकडून ठोस कार्यवाही करण्याचे सोडून करभार वाढवून जनतेच्या अडचणीत भर टाकली जात आहे. अशावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी चिंता व्यक्त केली आहे.

Advertisement

आर्थिक क्षेत्रातील जाणकार असलेल्या मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे की, दारीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता पुढील वाटचाल १९९० च्या दशकाच्या आर्थिक संकटापेक्षाही आव्हानात्मक आहे. त्यामुळे सर्वच भारतीयांनी आपले जीवन सन्मानजनक होण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या प्राथमिक गरजा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement

१९९१ मध्ये काँग्रेस पक्षाने भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणांना सुरुवात केली होती. देशाच्या आर्थिक धोरणासाठी नवा मार्ग मोकळा केला होता. पृथ्वीवर कोणतीच शक्ती कोणाचे विचार रोखू शकत नाही, ज्याची वेळ आलेली आहे, असेच चित्र आहे.

Advertisement

एकूणच मनमोहन सिंग यांनी पुढील काळ हा सरकारी नाही तर नागरिकांसाठी आव्हानात्मक असू शकतो असेच सूचित केलेले आहे. सध्या करोनाच्या संकातापुढे केंद्र सरकार आणि राज्य सरकारी यंत्रणा हतबल असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. अशातच मनमोहन सिंग यांनी सूचित केलेल्या या इशाऱ्याकडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कशा पद्धतीने पाहते यावर पुढील दिशा ठरणार आहे.

Advertisement

BLOG : पहा ‘पेगासस’च्या मुद्द्यावर रविशकुमार यांनी नेमके काय म्हटलेय; खूपच गंभीर आहे प्रकरण

Advertisement

पाकिस्तानवर कोसळले भयंकर संकट; पहा काय केविलवाणी परिस्थिती झालीय देशाची

Advertisement
Advertisement

Leave a Reply