Take a fresh look at your lifestyle.

क्रिप्टोकरन्सी जोरात..! गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..

मुंबई : जगभरात क्रिप्टोकरन्सीच्या किमतींत तेजी कायम आहे. भारतात कायदेशीर मान्यता नसली, तरी दिवसागणिक क्रिप्टोकरन्सीजचे आकर्षण वाढत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वर्तविण्यात आलेली शक्यता, तसेच डेल्टा व्हेरिएंटमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांनी क्रिप्टोकरन्सीकडे मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. कारण, सलग चौथ्या दिवशी आज भारतात प्रमुख डिजिटल करन्सीच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या बिटकॉइनमध्ये गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे बिटकॉइनचा भाव ३० हजार डॉलरच्याही खाली घसरला होता. याच वर्षी बिटकॉइनने ६४८९५.२२ डॉलरची विक्रमी पातळी गाठली होती. सध्या त्याची किंमत निम्म्यावर आली आहे. मात्र, सलग चार सत्रात त्यात झपाट्याने वाढ झाली असून, आज त्यात २.९३ टक्के वाढ झाली. बिटकॉइनचा आजचा भाव ३३५०० डॉलरपर्यंत वाढला. बिटकॉइनची एकूण बाजारपेठ ६२८०५८२०२१८५ डॉलर आहे.

Advertisement

बिटकॉइननंतर दुसऱ्या क्रमांकावरील इथेरियमचाचा भावही आज २१०० डॉलरवर गेला. इथेरियममध्ये आज २.८२ टक्के वाढ झाली. एका इथेरियमचा भाव २११३.६५ डॉलर झाला. शुक्रवारी इथेरियमचा भाव २०७० डॉलरवर गेला होता. त्याआधी गुरुवारी तो १९८४ डॉलर इतका होता.

Advertisement

डोजेकॉइनमध्ये मात्र ०.२३ टक्क्याची घसरण झाली. त्याचा भाव ०.१९१७ डॉलर झाला. एक्सआरपीचा भाव ०.६०५२ डॉलर असून त्यात ०.५८ टक्के घसरण झाली आहे. कार्डानोच्या किमतीत १.०६ टक्के वाढ झाली असून त्याचा भाव १.२१ डॉलर झाला आहे. पोलकॅडोटच्या किमतीत २.४२ टक्के घसरण झाली असून त्याचा भाव १३.१७ डॉलर आहे.

Advertisement

जगभरातील आघाडीच्या १० क्रिप्टोकरन्सीजचे आजचे बाजार भांडवल १.३७ लाख कोटी डॉलर्स झाले होते. त्यात २.८२ टक्के वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत क्रिप्टो करन्सीमध्ये ७१.८३ अब्ज डॉलर्सची उलाढाल झाली. शुक्रवारच्या तुलनेत त्यात १३.५५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.

Advertisement

आय्योव.. म्हणून त्या आईसक्रिमला आहे सोन्याची किंमत; ६० हजारांना मिळतोय एकच कप..!
आयकर पोर्टल ऑगस्टपासून सेवेत..! मोदी सरकारची ग्वाही, करदात्यांना कसा फायदा होणार, जाणून घेण्यासाठी वाचा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply