Take a fresh look at your lifestyle.

भारतात स्वत:चे डिजिटल चलन आणणार, ‘आरबीआय’चा मोठा निर्णय, तुमचा काय फायदा होणार, जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक टप्प्याटप्प्याने स्वतःचं डिजिटल चलन आणणार आहे. सध्या या धोरणावर आरबीआयचे काम सुरु आहे. प्रायोगिक तत्वावर घाऊक आणि किरकोळ क्षेत्रात हे डिजिटल चलन आणले जाणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी दिली.

Advertisement

डिजिटल चलन यंत्रणा विकसित करण्याबाबत जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका काम करीत आहेत. त्यावर भारतातही गांभीर्याने काम सुरू आहे. मात्र, कोणतीही सरकारी मान्यता न मिळालेल्या डिजिटल चलनांपासून ग्राहकांनी सावध राहणं आवश्यक आहे.

Advertisement

देशात डिजिटल चलन कार्यान्वित करण्याची अंमलबजावणी लवकरच होण्याची शक्यता आहे. इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांप्रमाणेच भारतीय रिझर्व्ह बँकही बऱ्याच काळापासून डिजिटल चलनाच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Advertisement

अर्थ मंत्रालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय मंत्री गटाने याबाबतचे धोरण आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास केला असून, देशात रिझर्व्ह बँकेला स्वतःचं डिजिटल चलन सादर करण्याची शिफारस केली आहे. बँकिंग प्रणाली आणि आर्थिक धोरणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे रविशंकर यांनी स्पष्ट केले.

Advertisement

देशाचे स्वतःचे डिजिटल चलन आणण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यांतर्गत सध्याच्या तरतुदी या भौतिक चलन डोळ्यासमोर ठेवून केल्या आहेत. डिजिटल चलन आणण्याकरता या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. यासाठी नाणी कायदा, फेमा आणि आयटी कायद्यातही सुधारणा करावी लागणार असल्याचे रविशंकर यांनी नमूद केले.

Advertisement

डिजिटल चलनासोबत काही जोखीमही येते. अचानक अडचण आल्यास बँकेतून पैसे काढताना दडपण येते. डिजिटल चलन आल्यास अशा प्रसंगी काही जोखीम येऊ शकते. मात्र, संभाव्य फायद्यांचा विचार करून या डिजिटल चलनाचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणं आवश्यक असल्याचे रविशंकर यांनी नमूद केले.

Advertisement

मोदी सरकार करणार आणखी दोन मोठ्या बॅंकांचे खासगीकरण, मग खातेदारांचे काय होणार, जाणून घेण्यासाठी वाचा..
बाब्बो.. आर्थिक घडामोडींवर मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलीय ‘ही; चिंता..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply