Take a fresh look at your lifestyle.

करोना झटक्यातही आलीय ‘ही’ गुड न्यूज; पहा अॅग्रो व फूड सेक्टरसह कशामध्ये दिसलाय परिणाम

मुंबई : करोना कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक कंपन्यांना झटके बसले. मात्र, त्याचवेळी जिद्दीने लढून यश मिळवण्याची खात्री वाटणाऱ्या अनेकांनी स्वयंरोजगार आणि देशाच्या रोजगार वाढीमध्ये योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली केलेल्या आहेत. त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम पुढे येण्यास मोठा कालावधी लागेल. मात्र, देशाचा विचार करता ही एक गुड न्यूज समजली जात आहे.

Advertisement

कोरोना काळात मात्र नव्या कंपन्या मोठ्या संख्येने अस्तित्वात आल्या आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षात एकूण 1 लाख 3 हजार 64 नव्या कंपन्या अस्तित्वात आल्या होत्या. मात्र, 2020-21 या वर्षात यामध्ये मोठी वाढ होऊन आता कंपन्यांची संख्या 1 लाख 47 हजार 237 इतकी झाली आहे. म्हणजेच, एकाच वर्षात यामध्ये 43 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

Advertisement

कॉर्पोरेट मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कृषी आणि संबंधित क्षेत्रात एकूण 5 हजार 10 कंपन्या होत्या, 2021-21 मध्ये यांची संख्या 11037 इतकी झाली आहे. म्हणजेच, या क्षेत्रात एकाच वर्षात 120 टक्के वाढ झाली आहे. आरोग्य आणि सामाजिक क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्रात 2019-20 या वर्षात 1110 कंपन्या कार्यरत होत्या. आता यामध्ये वाढ होऊन कंपन्यांची संख्या 6934 इतकी आहे. या क्षेत्रात नव्या कंपन्यात तब्बल 525 टक्के वाढ झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात 315 टक्के नवीन कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे. 2019-20 या वर्षात 1079 कंपन्या होत्या, आता मात्र देशात 4476 कंपन्या कार्यरत आहेत.

Advertisement

फूड प्रॉडक्ट्स क्षेत्रात सुद्धा नव्या कंपन्यांची संख्या वाढली आहे. या क्षेत्रात एकूण 4483 कंपन्या होत्या आता मात्र 7525 इतक्या कंपन्या अस्तित्वात आहेत. नव्या कंपन्यात 68 टक्के वाढ झाली आहे. होलसेल उद्योगात आधी 7556 कंपन्या होत्या आता 9514 कंपन्या अस्तित्वात आहेत. किरकोळ उद्योग क्षेत्रात एकूण 5201 कंपन्या होत्या.आता या क्षेत्रात कंपन्यात वाढ होऊन 6689 इतक्या कंपन्या आज कार्यरत आहेत. सोपर्ट्स क्षेत्रात 367 कंपन्या होत्या आता मात्र 1906 कंपन्या आहेत.

Advertisement

मागील वर्षात सेनेटेशन क्षेत्रात फक्त 19 कंपन्या होत्या. मात्र, 2020-21 या वर्षात त्यामध्ये वाढ होऊन आता कंपन्यांची संख्या 190 झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात एकूण 1 लाख 47 हजार 247 नव्या कंपन्या अस्तित्वात आल्या. यातील बहुतांश कंपन्या या जुलै ते डिसेंबर या काळात नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत.

Advertisement

Advertisement

Leave a Reply