Take a fresh look at your lifestyle.

पिक सल्ला : शंखी गोगलगायमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ करा; वाचा बातमी महत्वाची

सोलापूर : सध्या सोलापूर जिल्ह्यात बार्शी आणि परिसरात पिकांवर शंखी गोगलगायीचे आक्रमण झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. शंखी गोगलगायीने सोयाबीनचे शेंडे, पाने खाल्ल्याने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या गोळा करून नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.

Advertisement

याबाबत माहिती देताना तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी म्हटले आहे की, पिकांवर शंखी गोगलगायीचे आक्रमण झालेले आहे. त्या पिकांचे शेंडे, पाने खाऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी बांध स्वच्छ ठेवावे. त्यामुळे त्यांना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी त्या गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून ठेवावेत. गोगलगायी तेथे आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी अंड्यांसह त्या गोळा करून नष्ट कराव्यात. एकूणच सर्व काळजी घेऊन शेतकऱ्यांनी हे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

करोना झटक्यातही आलीय ‘ही’ गुड न्यूज; पहा अॅग्रो व फूड सेक्टरसह कशामध्ये दिसलाय परिणाम

Advertisement

अंबानींच्या रिलायंसलाही बसलाय ‘असा’ झटका; पहा कशाचा परिणाम झालाय ते

Advertisement
Advertisement

Leave a Reply