Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय गुंतवणूकदारांना

मुंबई : घरपोहोच खाद्य पदार्थ देणाऱ्या आघाडीच्या झोमॅटो या कंपनीच्या शेअरने आज भांडवली बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली. कंपनीच्या आयपीओस गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिला होताच. त्यानंतर आता या कंपनीच्या शेअर्सचे भांडवली बाजारात जबरदस्त लिस्टींग झाल्याचे दिसून आले. झोमॅटोच्या शेअर्सचे दर आयपीओ किंमतीच्या तुलनेत जवळपास 80 टक्के प्रमिअमवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांनी आज पहिल्याच दिवशी जोरदार कमाई केली.

Advertisement

कंपनीने नियोजित वेळेआधीच भांडवली बाजारात प्रवेश केला आहे. आज शुक्रवारी सकाळी झोमॅटोच्या शेअर्सची नोंदणी झाली. झोमॅटोच्या शेअर्ससाठी प्राइज बँड 76 रुपये निश्चित करण्यात आला होता. याआधी कंपनीने 23 ते 27 जुलै दरम्यान शेअर्स लिस्ट होऊ शकतात असे म्हटले होते. मात्र, त्याआधीच या शेअर्सची नोंदणी झाली आहे. याआधी आयपीओमधून कंपनीने 9375 कोटी रुपये उभारले आहेत. समभाग विक्रीस गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिला होता. झोमॅटोचा आयपीओ सरासरी 40.38 पटीने सबस्क्राइब झाला. जवळपास 2.13 लाख कोटींचे प्रस्ताव कंपनीला मिळाले आहेत. झोमॅटोचा आयपीओ मार्च 2020 नंतर देशातील सर्वात मोठा आयपीओ होता.

Advertisement

कंपनीच्या आर्थिक कामगिरीचा विचार केला तर 2020 या आर्थिक वर्षात कंपनीला 2604.7 कोटींचा महसूल मिळाला. त्याआधी 2019 या वर्षात 1312.58 कोटींचा महसूल मिळाला होता. सध्या कंपनीच्या नुकसानीत वाढ होत असली तरी तोटा देखील वाढत चालला आहे. 2020 या आर्थिक वर्षात कंपनीला 2385.6 कोटी तर त्याआधीच्या आर्थिक वर्षात 1010.2 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

Advertisement

दरम्यान, सध्याच्या काळात अनेक कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. आता पतंजली कंपनीने सुद्धा आपला आयपीओ आणणार असल्याचे सांगितले आहे. ऑनलाइन विमा एकत्रित करणाऱ्या पॉलिसी बाजार या कंपनीचाही आयपीओ येणार आहे. कंपनीने आयपीओ आणण्याची तयारी केली असून या माध्यमातून कंपनीने साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी संकलित करण्याचे नियोजन केल्याची माहिती आहे. पॉलिसी बाजार या विमा कंपनीची मूळ पीबी फिन्टेक कंपनी आपला आयपीओ आणणार आहे. याबाबत 5 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत कंपनीच्या आयपीओला मान्यता देण्यात आली.

Advertisement

BLOG : पहा ‘पेगासस’च्या मुद्द्यावर रविशकुमार यांनी नेमके काय म्हटलेय; खूपच गंभीर आहे प्रकरण

Advertisement
Advertisement

Leave a Reply