Take a fresh look at your lifestyle.

हवामान अंदाज : ‘तो’पर्यंत राज्यभरात मुसळधारची शक्यता; पहा कुठे होणार पावसाचा दणका

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. त्यामुळे कोकण परिसरात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही पाऊस सुरुच आहे. हा पाऊस कधी कमी होईल असे वाटत असतानाच हवामान खात्याने पुन्हा नवा अंदाज दिला आहे. त्यानुसार आणखी चार ते पाच दिवस हा पाऊस असाच कोसळत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे 22 ते 26 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.

Advertisement

समुद्र किनारी असणाऱ्या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सांगली, कोल्हापूर, सातारा आणि नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. तसेच राज्यात अन्य जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सुरुवातीला जोरदार बरसल्यानंतर अचानक गायब झालेला मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊस होत आहे.

Advertisement

या व्यतिरिक्त देशातील काही राज्यात मान्सूनचा पाऊस जोरदार कोसळत आहे. राजधानी दिल्लीत सर्वदूर जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागानुसार पुढील तीन ते चार दिवसात पश्चिम आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश ते उत्तराखंड पर्यंत अनेक ठिकाणी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होणार आहे. बिहार, झारखंड, ओडिशा आणि छत्तीसगड राज्यात 23 जुलैपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तेलंगाणा, मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान या राज्यात अनेक ठिकाणी पुढील 24 तासात पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Advertisement

बदलला की मार्केट ट्रेंड; पहा काय चालूये सोन्याच्या बाजारात, आज झाली ‘इतकी’ वाढ..!

Advertisement

शेतकरी स्वातंत्र्यासाठी संघटना आक्रमक; निवडणूकित उतरणार आंदोलनाचे शिलेदार..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply