Take a fresh look at your lifestyle.

हवामान अंदाज : पहा कोणत्या भागाला रेड, तर कोणाला ऑरेंज अलर्ट; मगच पावसाचा जोर कमी होणार

पुणे : पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमूसळधार पाऊस होण्याचा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. तसेच उद्यापासून पुढील 5 दिवसात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Advertisement

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. त्यामुळे कोकण परिसरात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही पाऊस सुरुच आहे. हा पाऊस कधी कमी होईल असे वाटत असतानाच हवामान खात्याने पुन्हा नवा अंदाज दिला आहे. त्यानुसार आणखी चार ते पाच दिवस हा पाऊस असाच कोसळत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. राज्यात सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे 22 ते 26 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे असे म्हटलेले होते. मात्र, नव्या अंदाजात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

कोकण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आजही कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यातील एकूण सहा जिल्ह्यांना रेड तर पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचे काम सुरू आहे. तसेच आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

Advertisement

राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण भागात मात्र पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. या भागात काही जिल्ह्याना पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्र किनारी असणाऱ्या घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. अनेक मार्ग बंद झाले आहेत. रस्त्यात पाणी साचले आहे. पावसामुळे झाडे सुद्धा कोसळली आहेत. तसेच काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागात परिस्थिती सध्या खराब आहे.

Advertisement

BLOG : पहा ‘पेगासस’च्या मुद्द्यावर रविशकुमार यांनी नेमके काय म्हटलेय; खूपच गंभीर आहे प्रकरण

Advertisement

वाव.. NPCI घेऊन येत आहे नवी स्कीम; मग डिजिटल पेमेंटसाठी स्मार्टफोनचे महत्व संपणार..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply