Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला पुन्हा एकदा झळाळी..! गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण.. पाहा आजचे बाजारभाव..!

मुंबई : सोन्या-चांदीच्या भावाने गेल्या वर्षी उच्चांक गाठल्यानंतर त्यास घसरण लागली होती. मात्र, आता कोरोनातून देश सावरत असताना, पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून गडगडणारे सोन्याचे आणि चांदीचे भाव आता पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याची सांगता सोन्या-चांदीतील तेजीने झाली. शेअर बाजारात सोने-चांदीचा भाव वधारलेलाच राहिला आणि चढ्या दरावरच बाजार बंद झाले. सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

Advertisement

जागतिक बाजारातील तेजीसह सराफा बाजारात आज (ता. २३) सोन्याचा भाव 256 रुपयांच्या तेजीसह 46,698 रुपयांवर बंद झाला. चांदीच्या भावातही 662 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. चांदीचा सध्याचा बाजारभाव 66,111 रुपये किलाेवर पोहोचला आहे.

Advertisement

अमेरिकेत आर्थिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी झाल्यामुळे, जगभरात सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. आर्थिक गुंतवणुकीवरील परतावा कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार तिथली गुंतवणूक काढून सोने-चांदीत करीत दिसते.

Advertisement

सोन्यातील गुंतवणूक वाढू लागल्यामुळे त्याची मागणी वाढते आहे. साहजिकच त्याचा परिणाम सोन्याच्या बाजारभावावर होत आहे. सोन्याच्या दरात वाढ होण्याचा हा सिलसिला पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

सोन्यातील गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असून अल्पावधीत सोन्यातील गुंतवणुकीतून चांगला नफा गुंतवणूकदार मिळवू शकतात, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र, कुठल्याही फसव्या सल्ल्याला किंवा आमिषाला बळी न पडता योग्य आर्थिक सल्ला घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा, असे जाणकार सांगतात.

Advertisement

करोना इफेक्ट्समुळे मोबाईल मार्केटवरही झालाय ‘असा’ दुष्परिणाम; पहा नेमकी काय स्थिती आहे भारतात
‘काष्टी’मध्ये रुपड्याचाही भ्रष्टाचार नाही; पाचपुते यांनी केलाय दावा

Advertisement
Advertisement

Leave a Reply