Take a fresh look at your lifestyle.

करोना इफेक्ट्समुळे मोबाईल मार्केटवरही झालाय ‘असा’ दुष्परिणाम; पहा नेमकी काय स्थिती आहे भारतात

मुंबई : एप्रिल ते जून या तिमाही दरम्यान भारतात 3.24 कोटी स्मार्टफोन आयात केले होते. मात्र, वार्षिक तुलनेत यामध्ये 13 टक्के घट झाली आहे. मागील वर्षात मे महिन्यात देशभरात कडक लॉकडाऊन असतानाही स्मार्टफोनच्या विक्रीत 87 टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. तसे पाहिले तर, मोबाइल बाजारात चीनच्या मोबाइल कंपन्यांचा दबदबा आहे. काही दिवसांपूर्वी शाओमी मोबाइल कंपनीने जगातील दिग्गज मोबाइल कंपनी एप्पलला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला होता. भारतात सुद्धा चायनीज मोबाइलला मोठी मागणी आहे.

Advertisement

देशात शाओमी कंपनीच्या मोबाइलची सर्वाधिक विक्री झाली आहे. 95 लाख मोबाइल विक्रीसह या कंपनीने 29 टक्के मार्केट शेअर मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग आणि रियलमी कंपनीस तिसरा क्रमांक मिळाला आहे. देशात सॅमसंगचे 55 लाख तर रियलमीचे 49 लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत. मोबाइल कंपनीने एखादा नवा स्मार्टफोन बाजारात आणला की त्यास प्रतिसाद मिळतोच. त्यातही भारतासारख्या मोठ्या देशात तर अब्जावधींचे स्मार्टफोन काही वेळातच विकले जातात. त्यामुळे मोबाइल कंपन्या भारतीय बाजारपेठांना नेहमीच प्राधान्य देतात. यावेळी मात्र कोरोनाने या परिस्थितीत बदल केला आहे.

Advertisement

कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच देशात इंधन दरवाढ आणि महागाईत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा फटका स्मार्टफोनच्या बाजारालाही बसला आहे. परिणामी यंदा देशातील स्मार्टफोनच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा अहवाल आला आहे, यानुसार पहिल्या तिमाहीत स्मार्टफोनची विक्री कमी झाल्याचे दिसून आले आहे. आजच्या स्मार्टफोनच्या जमान्यात तर नवीन फोन आला की कोट्यावधींची उलाढाल ठरलेलीच आहे. आणि त्यातही स्मार्टफोन जर चीनी कंपनीचा असेल तर मग विचारायलाच नको.. आताही मोबाइलच्या दुनियेत शाओमी मोबाइल कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे.

Advertisement

शाओमीने जगातील दिग्गज टेक कंपनी एप्पलला सुद्धा मागे टाकले आहे. होय, शाओमी दुसर्‍या तिमाहीत जगातील दुसर्‍या क्रमांकाची स्मार्टफोन कंपनी म्हणून उदयास आली आहे. कॅनालिस रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, चीनी कंपनीने शिपमेंटमध्ये 83 टक्क्यांनी मोठी वाढ केली आहे. शाओमीने स्मार्टफोन शिपमेंट विभागात जागतिक स्तरावर पहिल्या दोन कंपन्यांतच्या यादीत नावलौकीक मिळवला आहे. शाओमीने पहिल्यांदाच दुसरा क्रमांक मिळवला आहे. आतापर्यंत सॅमसंग आणि एप्पल या दोन कंपन्या आतापर्यंत पहिल्या क्रमांकावर आणि दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

Advertisement

BLOG : पहा ‘पेगासस’च्या मुद्द्यावर रविशकुमार यांनी नेमके काय म्हटलेय; खूपच गंभीर आहे प्रकरण

Advertisement

IMP Info : भारतात सुरूये ‘पोर्न’चाही बाजार; राज कुंद्रा यांच्या निमित्ताने पहा देशभरातील अश्लीलतेचे वास्तव काय ते

Advertisement
Advertisement

Leave a Reply