Take a fresh look at your lifestyle.

‘डेल्टा’नंतर आता ‘गामा करोना’ही जोरावर; पहा कुठे आढळलेत रुग्ण

दिल्ली : कोरोना व्हायरस म्यूटेशनच्या माध्यमातून सतत बदलत आहे. त्यामुळेच या विषाणूचे अनेक नवे व्हेरिएंट उदयास आले आहेत. विषाणू सतत बदलत असून आधिक घातक होत आहे. रशियात सध्या कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. डेल्टा व्हेरिएंट आणि लसीकरणाचा कमी असलेला वेग या दोन कारणांमुळे येथे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. गामा व्हेरिएंट आढळल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

कोरोनाचा मुक्काम अजून कायम आहे. आता तर डेल्टा, डेल्टा प्लस, कप्पा अशा नव्या रुपात कोरोना आला आहे. त्यामुळे जगभरातच कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वेगाने वाढत चालले आहेत. आता तर रशियात कोरोनाचा गामा व्हेरिएंट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याआधी हा व्हेरिएंट ब्राझील मध्ये आढळला होता. इंटरफैक्स न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार रशियात कमी प्रमाणात गामा व्हेरिएंटचे संक्रमण आढळले आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान १० टक्के तरी लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जोपर्यंत जगातील प्रत्येक ठिकाणी महामारी नष्ट होणार नाही तोपर्यंत या महामारीचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. जगात काही देश लसीकरणात खूप पुढे गेले आहेत तर काही देशात अजूनही कोरोना प्रतिबंधक लस मिळालेल्या नाहीत.

Advertisement

याआधी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविड १९ च्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले होते. आजमितीस जगातील शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे.

Advertisement

लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आतापर्यंत कोरोनाच्या जितक्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक संक्रामक आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट वेगाने फैलावत चालला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. त्यामुळे सुद्धा जगभरात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत चालले आहे.

Advertisement

अर्र.. फ़क़्त पत्रकार-विरोधी नेतेच नाही.. तर CBI प्रमुख व अंबानींचे नावही आहे ‘पेगासस’च्या यादीत..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply