Take a fresh look at your lifestyle.

कांदा उत्पादनवाढ IMP ट्रिक्स : पहा बीजप्रक्रिया किती आहे महत्वाची; पहा शास्त्रशुद्ध माहिती

नाशिक : कांद्यामध्ये कमी खर्चात जास्तीचे उत्पादन घेणे हाच खरा यशस्वी शेतीचा मूलमंत्र आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच रोपे टाकावीत असे आवाहन राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढवणे शक्य आहे.

Advertisement

चितेगाव फाटा (निफाड) येथील केंद्राचे तांत्रिक अधिकारी मनोजकुमार पांडे, सहायक संचालक डॉ आर. सी. गुप्ता, डॉ. सुजय पांडे, उपसंचालक डॉ. सत्येंद्र सिंग यांनी कांदा उत्पादनाबाबत मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, खरीप हंगामात कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्याबरोबरच बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी अनुसंधान केंद्राशी (०२५५०-२३७८१६) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
कांदा उत्पादनाचे महत्वाचे तंत्र असे :
रोपवाटिकेला जागा निवडताना ती समतल व पाण्याचा निचरा होणारी आणि जागेभोवती मोठे वृक्ष नसणारी असावी
एक हेक्टर लागवडीसाठी आठ ते दहा किलो बियाणे वापरा
गादी वाफे तयार करताना ते तीन मीटर लांब एक मीटर रुंद व १५ सेंटिमीटर उंचीचे असावे
प्रतिवर्ग मीटरमध्ये चार ते पाच ग्रॅम थायरम अथवा कॅप्टन मिसळून प्रत्येक गादीवाफ्यात पंधरा ते वीस किलो ग्रॅम शेणखत किंवा आठ ते दहा किलो ग्रॅम गांडूळखत टाका
वाफ्यात ५ ते ७ सेंटिमीटर अंतरावर एक सेमी खोलीच्या ओळी पाडून त्यात बियाणे टाका
बियाण्यास प्रतिकिलो दोन ग्रॅम कॅप्टन अथवा थायरम चोळल्यास रोपे कोलमडत नाहीत
रोपे १५ दिवसाची झाल्यानंतर मररोग होण्याची अथवा ते कोलमडून जाण्याची शक्यता असताना सात ते दहा दिवसाच्या अंतराने एक लिटर पाण्यात एक ग्रॅम कार्वेन्डाजिम किंवा तीन ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइडची फवारणी रोपांच्या मुळाजवळ करा

 

Advertisement

BLOG : पहा ‘पेगासस’च्या मुद्द्यावर रविशकुमार यांनी नेमके काय म्हटलेय; खूपच गंभीर आहे प्रकरण

Advertisement

Big ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..! पहा कशामुळे सुरू झालाय ‘असा’ प्रकार..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply