Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. फ़क़्त पत्रकार-विरोधी नेतेच नाही.. तर CBI प्रमुख व अंबानींचे नावही आहे ‘पेगासस’च्या यादीत..!

मुंबई : एकीकडे देशात राजकीयदृष्ट्या आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हेरगिरीच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचवेळी इस्त्राईल आणि फ्रान्ससह अनेक देशांनी याची चौकशीही सुरू केली आहे. त्याचवेळी आता तर हेरगिरीच्या या यादीत फ़क़्त पत्रकार-विरोधी नेतेच नाही तर सुप्रसिद्ध उद्योगपती आणि सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्यावरही पाळत ठेवली जात असल्याचे ‘वास्तव’ जगजाहीर करणाऱ्या बातम्या येत आहेत.

Advertisement

इस्रायली कंपनी एनएसओचे हेरगिरी साॅफ्टवेअर पेगाससबाबत अनेक धक्कादायक बातम्या जगभरातील प्रमुख माध्यम समूहांनी दिलेल्या आहेत. १० देशांच्या १७ माध्यम संस्थांनी ‘फॉरबिडन स्टोरीज’च्या हवाल्याने म्हटले आहे की, भारताचे माजी सीबीआय प्रमुख आलोक वर्मा हेसुद्धा पेगाससच्या रडारवर होते. तसेच राफेल कराराशी संबंधित सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी व त्यांच्या कंपनीशी संबंधित लाेकांचे नंबरही पेगाससच्या यादीत टाकण्यात आलेले होते.

Advertisement

वर्माही हेरगिरीचे टार्गेट होते. २०१८ मध्ये त्यांना पदावरून हटवल्याच्या काही तासांतच त्यांचा फोन नंबर पेगाससच्या यादीत टाकण्यात आल्याचे बातम्यात म्हटलेले आहे. वर्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांचे ८ फोन नंबर पेगाससच्या रडारवर होते. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या टेक लॅबने या बातम्यांना दुजोरा दिला आहे. पेगाससच्या निशाण्यावरील ५० हजार नंबर्सच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट शेकडो भारतीय नंबर्सची पडताळणी करण्यात आलेली आहे.

Advertisement

राफेल करारात कसे एका विशेष कंपनीला भागीदार निवडण्यात आले हे फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी सांगितले तेंव्हा अंबानी यांच्या कंपनीचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन चीफ जेसुदासन आणि त्यांच्या पत्नीचे नंबरही पाळतीच्या यादीत दिसतात. अंबानींचा नंबर फक्त राफेल करारापर्यंतच सीमित नसल्याचे अनेकांना वाटत आहे. डॅसो एव्हिएशनचे भारतात प्रतिनिधी राहिलेले वेंकट राव पोसिना, साब इंडियाचे माजी प्रमुख इंद्रजित सियाल आणि बोइंग इंडियाचे प्रमुख प्रत्युषकुमार यांचे नंबरही यांच्यासह एनर्जी ईडीएफ या फ्रान्सच्या कंपनीचे प्रमुख हरमनजित नेगींचा नंबरही डेटाबेसमध्ये असल्याने एकूणच हा डाव किती मोठा असू शकतो याची व्याप्ती स्पष्ट झालेली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply